​ ‘बीफ’ व्हिडिओ शेअर करून भलतीच फसली काजोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2017 10:08 IST2017-05-02T04:36:27+5:302017-05-02T10:08:21+5:30

काजोलचा बीफ व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला. अन् बघता बघता व्हायरल झाला. पण यानंतर सोशल मीडियावर काजोलला टीकेचे धनी व्हावे लागले.

Kajol cropped up by sharing 'Beef' video! | ​ ‘बीफ’ व्हिडिओ शेअर करून भलतीच फसली काजोल!

​ ‘बीफ’ व्हिडिओ शेअर करून भलतीच फसली काजोल!

 
बीफ’ व्हिडिओ शेअर करून भलतीच फसली काजोल!

बॉलिवूडची सिमरन अर्थात काजोलचा ‘बीफ’ व्हिडिओ कालपासून व्हायरल होत आहे.  या व्हिडीओमध्ये काजोल आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करताना दिसत आहे. मी आणि माझ्या काही मैत्रिणी एका मित्राकडे दुपारच्या जेवणासाठी एकत्र जमलो आहोत. माझा मित्र रेयाननं जेवणासाठी खास मेन्यू तयार केला आहे, असे काजोल या व्हिडिओत सांगताना दिसते. यानंतर काजोलचा मोबाईल कॅमेरा बाऊलमधील एका खास पक्वानावर येतो. यावेळी रेयान त्या बाउलमधील पक्वान्नावर एक रस ओतताना दिसतो. यानंतर काजोल मोबाइल कॅमेरा स्वत:च्या चेह-यावर फोकस करुन तिचा मित्र रेयानला बोलावते व त्याला डिशबाबत माहिती द्यायला सांगते. यावर रेयान काय उत्तर देतो माहितीयं? बाऊलमधील या डिशमध्ये बीफचा समावेश आहे, असे तो सांगतो. यानंतर काजोलच्या तोंडाला चांगलचं पाणी सुटत. चला, आता मला माझे हात ही डिश संपवण्यासाठी वापरायचे आहेत, म्हणून ती मोबाईल कॅमेरा बंद करते. 



ALSO READ : ‘इशारों इशारों में’ करण जोहरवर बरसली काजोल!

काजोलचा हा बीफ व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला. अन् बघता बघता व्हायरल झाला. पण यानंतर सोशल मीडियावर काजोलला टीकेचे धनी व्हावे लागले. भारतात गोमांस अर्थात बीफ खाण्यास बंदी आहे. त्यामुळे या व्हिडिओवरून नेटिजन्सनी काजोलला चांगलेच धारेवर धरले. मग काय? वाद अंगलट येण्याची चिन्हे दिसताच काजोलने सारवासारव केली. माझ्या मैत्रिणींसोबत मी बीफ खात असल्याचे एका व्हिडिओत म्हटले गेले आहे. त्यात बोलण्यामध्ये काहीतरी गडबड झाली आहे. ते बीफ नव्हतंच. व्हिडिओत जी डीश दाखविण्यात आलेली ते म्हशीचं मटण होतं आणि हे खाण्यास कायदेशीर परवानगी आहे. हा एक संवेदनशील मुद्दा असल्यामुळेच मी हे स्पष्टीकरण देतेय. यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही, असा खुलासा तिने केला. शिवाय तो व्हिडिओही डिलिट केला.
 या स्पष्टीकरणावर अभिनेता अनुपम खेर यांनी काजोलला ‘गमतीशीर’ पाठींबा दिला आहे. डिअर काजोल नमस्ते. बेटा तू सांगून का टाकत नाही की ती देसी गोमाता नव्हती. पनामा येथून ते खासकरून मागवलं होतं. भक्तांना ते खरं वाटेल. ते म्हशीचं मटण होत, जर तू खरं बोलत असशील तर लोक तुला नक्कीच पाठिंबा देतील. हेच दिवस बघण्यासाठी तुझं राजसोबत लग्न लावलं होतं? असो, स्पष्टीकरण देणंही गरजेचं आहे. नाहीतर वेडे भक्तगण तलवारी घेऊन घरी येतील. काळजी घे बेटा,असे त्यांनी म्हटलेय.

Web Title: Kajol cropped up by sharing 'Beef' video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.