​‘कबाली’ फिव्हर..मुंबईत पहिला शो पहाटे तीन वाजता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 15:06 IST2016-07-21T09:36:40+5:302016-07-21T15:06:40+5:30

सुपरस्टार रजनीकांत याचा तमिळ चित्रपट 'कबाली' चा फिव्हर वाढला असून मुंबईच्या अरोरा सिनेमागृहात पहाटे ३ वाजता सुरू होईल.२२ रोजी ...

'Kabbali' Fever..The first show in Mumbai at three o'clock in the morning | ​‘कबाली’ फिव्हर..मुंबईत पहिला शो पहाटे तीन वाजता

​‘कबाली’ फिव्हर..मुंबईत पहिला शो पहाटे तीन वाजता

परस्टार रजनीकांत याचा तमिळ चित्रपट 'कबाली' चा फिव्हर वाढला असून मुंबईच्या अरोरा सिनेमागृहात पहाटे ३ वाजता सुरू होईल.२२ रोजी प्रदर्शित होणाºया या चित्रपटाचे पहाटे ३, सकाळी ६ आणि १० वाजता, दुपारी ३ आणि संध्याकाळी ६ वाजता तर रात्री ९ वाजता शो ठेवण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे शुक्रवारी या सर्व शोची तिकीटे संपली असल्याचे अरोरा थियटरचे मालक नंबी राजन यांनी सांगितले. रजनीकांतच्या 'कबाली' चित्रपटासाठी अरोरा थियटर नव्याने रंगवण्यात आले आहे. नवा स्क्रिन आणि साऊंड सिस्टमही लावण्यात आली असल्याचे नंबी यांनी सांगितले. शुक्रवारनंतर मात्र नेहमीप्रमाणे चार शो दाखवण्यात येणार आहेत. त्याचेही अ‍ॅडव्हान्स बुकींग जोरात असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: 'Kabbali' Fever..The first show in Mumbai at three o'clock in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.