जान्हवी कपूरकडे ‘ही’ मागणी करताच तिने जोडले हात, पाहा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 18:09 IST2018-05-08T12:39:17+5:302018-05-08T18:09:44+5:30
श्रीदेवीची लेक जान्हवी कपूरचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये ती हात जोडताना दिसत आहे. सोनम कपूरच्या लग्नातील हा व्हिडीओ आहे.
(1).jpg)
जान्हवी कपूरकडे ‘ही’ मागणी करताच तिने जोडले हात, पाहा व्हिडीओ!
अ िनेत्री सोनम कपूरच्या लग्नात जान्हवी कपूर सर्वाधिक चर्चेत राहिली. कारण दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मुली जान्हवी आणि खुशी लग्नात काय परिधान करणार? त्या कशा दिसणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. अशात जेव्हा जान्हवीने वडील बोनी कपूर आणि लहान बहीण खुशी कपूरसोबत लग्नस्थळी एंट्री केली तेव्हा सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. गुलाबी आणि काहीशा निळ्या रंगाच्या लहेंग्यात जान्हवी खूपच सुंदर दिसत होती. जान्हवीने आपल्या फॅशन सेन्सनी दाखवून दिले की, तीदेखील ‘मॉम’ श्रीदेवीसारखीच स्टायलिश आहे. दरम्यान, लग्नस्थळावरील जान्हवीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, त्यामध्ये ती चक्की हात जोडताना दिसत आहे.
त्याचे झाले असे की, सोनम आणि आनंद आहुजाचे लग्न पार पडल्यानंतर जान्हवी कपूर घरी जाण्यास निघाली होती. तेवढ्यात काही छायाचित्रकारांनी तिला फोटो काढू देण्याची विनंती केली. छायाचित्रकारांकडून जान्हवीला जोरजोरात आवाज देत एक फोटो काढू देण्याची विनंती केली गेली. मात्र जान्हवीने हात जोडून त्यांची माफी मागत पुढे जाणे योग्य समजले. सध्या जान्हवीचा हात जोडतानाचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असून, त्यात जान्हवीचा अंदाज बघण्यासारखा आहे.
दरम्यान, बोनी आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर ‘सैराट’चा हिंदी रिमेक ‘धडक’मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. तिच्यासोबत शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर मुख्य भूमिकेत बघावयास मिळणार आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग अंतिम टप्प्यात असून, चाहत्यांमध्ये त्याविषयी प्रचंड उत्सुकता आहे. जान्हवीचा डेब्यू बघण्यासाठी तिचे चाहते आतुर असून, जान्हवीला याविषयीची प्रचंड उत्सुकता आहे. दरम्यान, सोनमच्या लग्नात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार पोहोचले होते. रात्री लग्नाच्या रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.