जान्हवी कपूर दिसली इशान खट्टरसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 12:42 IST2017-03-15T07:10:46+5:302017-03-15T12:42:10+5:30

21 वर्षांच्या इशान दिग्दर्शक माजिद मजीदीच्या  बियॉण्ड द क्लाउडच्या चित्रिकरणात बिझी आहे. सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये हे दोघे एकत्र दिसणार ...

Janhavi Kapoor appeared with Ishan Khattar | जान्हवी कपूर दिसली इशान खट्टरसोबत

जान्हवी कपूर दिसली इशान खट्टरसोबत

21
र्षांच्या इशान दिग्दर्शक माजिद मजीदीच्या  बियॉण्ड द क्लाउडच्या चित्रिकरणात बिझी आहे. सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये हे दोघे एकत्र दिसणार असल्याची चर्चा आहे. जान्हवी कपूर धर्मा प्रॉ़डक्शनच्या या चित्रपटाव्दारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जान्हवी कपूर वेगवेगळ्या विषयांना घेऊन चर्चेत आहे. जान्हवीच्या  बॉलिवूडमध्ये एंट्री घेणार असल्याची चर्चा तर गेल्या अनेक दिवसांपासून आहे तर दुसरीकडे आपल्या अफेर्सना घेऊऩही ती चर्चेत राहिली. जान्हवीचे बॉयफ्रेण्ड  शिखर पहारीयाबरोबरचे किस्स करतानाचे फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ माजवली होती. यानंतर श्रीदेवी जान्हवीवर चांगलीच नाराज झाली होती. सार्वजनिक ठिकाणी किंवा पार्ट्ंयाच्या ठिकाणी श्रीदेवी जान्हवी बरोबर आर्वजून उपस्थित असायची. यानंतर बॉलिवूडमध्ये एका विशिष्ट उंचीवर स्वत:ला बघायचे तर ‘नो बॉयफ्रेन्ड’ हे तत्त्व सतत स्मरणात ठेव, असे तिने जान्हवीला बजावल्याचे कळले होते. केवळ शिखरच नाही तर मित्रांसोबत बाहेर फिरण्यासही श्रीदेवीने जान्हवीला बंदी घातल्याचे ऐकवात आले होते. मात्र त्यांनतर श्रीदेवीने जान्हवी आणि शिखर पहारिया यांचे नाते स्वीकारले असल्याचे समजले. डिअर जिंदगीच्या स्पेशल स्क्रिनिंगला जान्हवी, शिखर यांच्यासोबत श्रीदेवी आणि बोनी कपूर ही दिसले होते.  गेल्या काही दिवसांपासून इशान आणि जान्हवी एकमेकांना टेड करत असल्याची ही चर्चा होती. 

Web Title: Janhavi Kapoor appeared with Ishan Khattar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.