श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेत हसताना दिसली जॅकलीन फर्नांडिस; लोकांचा झाला संताप!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 04:19 PM2018-02-28T16:19:13+5:302018-02-28T21:49:13+5:30

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी अक्षरश: गर्दी केली होती. यावेळी प्रत्येकाच्या डोळे पाणावले होते; परंतु अभिनेत्री ...

Jacqueline Fernandes laughs at Sreadevi's funeral; People got angry! | श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेत हसताना दिसली जॅकलीन फर्नांडिस; लोकांचा झाला संताप!

श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेत हसताना दिसली जॅकलीन फर्नांडिस; लोकांचा झाला संताप!

googlenewsNext
वंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी अक्षरश: गर्दी केली होती. यावेळी प्रत्येकाच्या डोळे पाणावले होते; परंतु अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिच्या चेहºयावर चक्क स्माइल बघावयास मिळाली. जॅकलीन जेव्हा श्रीदेवी यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचली तेव्हा तिने हसत हसत श्रीदेवी यांना श्रद्धांजली अर्पण केली. जॅकलीनचे हसतानाचे काही फोटोज् कॅमेºयामध्ये कैद झाल्यानंतर ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्यामुळे आता जॅकलीनला नेटकºयांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. 

कारण जॅकलीनचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी तिला ट्रोल करण्यात सुुरुवात केली. अनेकांनी जॅकलीनला चांगलीच खरी-खोटी सुनावली. काहींनी तर एखाद्याच्या अंत्ययात्रेत कशा प्रकारे वावरायला हवे याची तिला शिकवणच दिली. एका युजर्सनी लिहिले की, ‘काही गरज नव्हती श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी जाण्याची. कारण याठिकाणी तू केवळ मीडियामध्ये झळकण्यासाठीच पोहोचली होती.’ श्रीदेवी यांच्या चाहत्यांनी जॅकलीनला चांगलेच धारेवर धरले. 



दरम्यान, श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येनी त्यांचे चाहते सहभागी झाले होते. यावेळी चाहत्यांना भावना अनावर करणे मुश्कील झाले होते. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. रस्त्यावर अक्षरश: जनसागर उसळला होता. यावरून श्रीदेवी यांच्यावर लोक किती प्रेम करीत होते हे स्पष्ट होते. त्याचबरोबर भलेही श्रीदेवी आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहणार आहेत. 

Web Title: Jacqueline Fernandes laughs at Sreadevi's funeral; People got angry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.