It's Shocking : चित्रपटात येण्याआधी आयुष्यमान खुराणा ट्रेनमध्ये गाणं गाऊन पैस कमवायचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 10:10 IST2017-09-04T11:56:37+5:302017-09-05T10:10:59+5:30

बॉलिवूडमध्ये 2012 साली आलेल्या विक्की डोनर याचित्रपटाने आयुष्यमान खुराणाने आपल्या करिअरची सुरूवात केली आहे. आज त्याला इंडस्ट्रीमधील सगळ्यात यशस्वी ...

It's Shocking: Before you go to the movie, earn a living in a live Khurana train on a song | It's Shocking : चित्रपटात येण्याआधी आयुष्यमान खुराणा ट्रेनमध्ये गाणं गाऊन पैस कमवायचा

It's Shocking : चित्रपटात येण्याआधी आयुष्यमान खुराणा ट्रेनमध्ये गाणं गाऊन पैस कमवायचा

लिवूडमध्ये 2012 साली आलेल्या विक्की डोनर याचित्रपटाने आयुष्यमान खुराणाने आपल्या करिअरची सुरूवात केली आहे. आज त्याला इंडस्ट्रीमधील सगळ्यात यशस्वी अभिनेता म्हणून ओळखले जाते. नुकतेच रिलीज झालेले बरेली की बर्फी आणि शुभ मंगल सावधान या दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. आयुष्मान एक चांगला अभिनेता होण्याबरोबरच एक दमदार गायकसुद्धा आहे. अनेक शो चे अँकरींग करतानासुद्धा आपण त्याला पाहिले आहे. मात्र त्याचा इथपर्यंत पोहोचण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्याला चांगलाच संघर्ष करावा लागला आहे. नुकताच एक इंटरव्ह्यु दरम्यान आयुष्यमानने आपल्या संघर्षांच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. आयुष्मान म्हणाला कॉलेजच्या दिवसात दिल्लीतून मुंबईत येणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गाणं गाऊन तो पैसे जमवायचा.   

ALSO READ : आयुष्यमान खुराणाने भूमी पेडणेकरला घडविली ‘कंडोम राइड’!

मित्रांसोबत बाहेर जाण्यासाठी पैसे नसायचे ते पैसे मिळवण्यासाठी तो ट्रेनमध्ये गाणं गाऊन पैसे जमवून तो मित्रांसोबत गोव्याला जायचा. ढोल आणि गिटार घेऊन सेकंड क्लास कम्पार्टमेंटपासून ते फर्स्ट क्लासपर्यंत लोकांना गाणं ऐकवायचे. आज आयुष्यमानचे नाव इंटस्ट्रीतील टॉप टेन अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. विक्की डोनरमध्ये अभिनयासोबतच आयुष्यमानने गाणे सुद्धा गायले होते आणि ते गाणे चांगलेच हिट ठरले होते. शुभ मंगल सावधान मध्ये त्यांना त्यांने साकारलेली मुदित ही व्यक्तिरेखा चांगलीच हिट झाली आहे. आनंद एल राय दिग्दर्शित शुभ मंगल सावधान चित्रपटातील भूमी पेडणेकर आणि आयुष्मान खुराणाची जोडी प्रेक्षकांना आवडली आहे. तसेच बरेली की बर्फी हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचून आणण्यास यशस्वी ठरला.   

Web Title: It's Shocking: Before you go to the movie, earn a living in a live Khurana train on a song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.