It's SHOCKING : गर्लफ्रेन्ड मिळावी म्हणून होणार ‘दमदमी माता’ दिशा पटानीची पूजा...!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2017 07:51 AM2017-02-14T07:51:02+5:302017-02-14T13:21:02+5:30

दिल्ली युनिव्हर्सिटीच्या हिंदू कॉलेजचे विद्यार्थी दरवर्षी व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी एका झाडाची पूजा करतात, हे तर तुम्हाला ठाऊक असेलच? या ...

It's shocking: Pooja 'Patni Mata' direction will be done for getting girlfriends! | It's SHOCKING : गर्लफ्रेन्ड मिळावी म्हणून होणार ‘दमदमी माता’ दिशा पटानीची पूजा...!

It's SHOCKING : गर्लफ्रेन्ड मिळावी म्हणून होणार ‘दमदमी माता’ दिशा पटानीची पूजा...!

googlenewsNext

/>दिल्ली युनिव्हर्सिटीच्या हिंदू कॉलेजचे विद्यार्थी दरवर्षी व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी एका झाडाची पूजा करतात, हे तर तुम्हाला ठाऊक असेलच? या झाडावर चालू वर्षातील सगळ्यात लोकप्रीय अभिनेत्रीचा फोटो लावून ‘दमदमी माते’च्या रूपात या फोटोची पूजा केली जाते. या पूजेसोबतच सगळेच विद्यार्थी  प्रेयसी मिळावी म्हणून प्रार्थना करतात. यावर्षी विद्यार्थ्यांनी अभिनेत्री दिशा पटानी हिला ‘दमदमी माता’ म्हणून निवडले आहे. द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी वोटिंगद्वारे या पूजेसाठी दिशाची निवड केली.





या वर्षी ‘दमदमी माता’साठी दिशाला सर्वाधिक मते मिळालीत आणि तिची निवड झाली. यापूर्वी उर्वशी रौतेला, सनी लिओनी, दीपिका पादुकोण अशा अनेक अभिनेत्रींची ‘दमदमी माता’ म्हणून निवड झाली आहे. हिंदू कॉलेजातील हे झाड ‘लव्हर्स पॉर्इंट’ म्हणून ओळखले जाते. या झाडाला ‘वर्जिन ट्री’ सुद्धा म्हटले जाते. फ्रेशर्स पंडित बनून ही पूजा करतात. या पूजेसाठी एक खास आरतीही रचली गेली आहे. ‘जय दमदमी माता, मैया जय दमदमी माता, तुमको दिनभर देखूं, रातभर सो नहीं पाता, मैया, जय दमदमी माता...’अशी ही आरती आहे.





या ‘वर्जिन ट्री’ला हार्ट शेप फुग्यांनी सजवले जाते. यानंतर यावर ‘दमदमी माते’चा फोटो लावला जातो. या ‘दमदमी माते’ची पूजा केल्याने सहा आठवड्याच्या आत ‘गर्लफ्रेन्ड’ मिळते. शिवाय पूजा करणारी व्यक्ति वर्जिन असेल तर वर्षभरात त्याची वर्जिनिटी भंग पावते, अशी एक विचित्र मान्यता या कॉलेजमध्ये आहे.
२०१५ मध्ये लिसा हेडन हिला ‘दमदमी माता’ बनवण्यात आले होते. २०१४ मध्ये दीपिका पादुकोण ही ‘दमदमी माता’ बनली होती. तेव्हा बघा, ‘वर्जिन ट्री’चे काही फोटो आणि वाचा ‘दमदमी माते’ची आरती.



Web Title: It's shocking: Pooja 'Patni Mata' direction will be done for getting girlfriends!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.