"नाकारात्मक भूमिका साकारणे मला जास्त आव्हानात्मक वाटते"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 18:51 IST2017-04-28T13:20:52+5:302017-04-28T18:51:26+5:30

शामा भगत  देसी गर्ल प्रियांका चोप्राने देशासह परदेशात आपल्या अभिनायची छाप सोडली आहे. बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्ये ही तिने आपले वेगळे ...

"It's more challenging to play a negative role" | "नाकारात्मक भूमिका साकारणे मला जास्त आव्हानात्मक वाटते"

"नाकारात्मक भूमिका साकारणे मला जास्त आव्हानात्मक वाटते"

ong>शामा भगत 

देसी गर्ल प्रियांका चोप्राने देशासह परदेशात आपल्या अभिनायची छाप सोडली आहे. बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्ये ही तिने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिचा आगामी चित्रपट हॉलिवूडपट बेवॉचच्या निमित्ताने त्याच्याशी साधलेला हा संवाद. 

मायदेशात परतल्यावर पहिल्यांदा तू काय केलेस?
 मी माझ्या फॅन्सना भेटली. त्यानंतर मी माझ्या जुहूमधल्या घरी गेली तिकड जाऊन तिथली शुद्ध हवा एन्जॉय केली. मी माझी काही पुस्तकं नीट लावून ठेवली, घरातल्या सोफा बदला. मला माझे नवे सजवायला याआधी अजिबात वेळ मिळाला नव्हता त्यामुळे इथे आल्यावर मी आधी ते केले.  

तू तुझ्या आईला तिकडे मिस केलेस का? 
आई इकडे आणि अमेरिकेत येईन जाऊन असायची. तिला तिकडे यायचे फक्त एखादे कारण  लागायचे. सो ती नेहमीच माझ्याबरोबर तिथे होती.

‘क्वांटिको' नवा सिजन येणार आहे का?
मला माहिती नाही.  त्यांनी सुद्धा अजून काहीच ठरवले नाही. त्यामागचे कारण असे की प्रत्येक सिजननंतर  ‘क्वांटिको'ची टीम सध्या लोकप्रिय असलेल्या  शो चा आणि टी आर पी चा अभ्यास करतात आणि मग ठरवतात की पुढील सिजन करायचा की नाही ते.

आता तू परत आली आहे मग एखादा चित्रपट साइन केला आहेस का ? तुझा पुढचा प्लॅन काय आहे?
मी अजून काहीच प्लॅन केलेला नाही आणि ना आधी गोष्टी घडत गेल्या मी काही प्लॅन नव्हते केले. मी एक कलाकार आहे आणि  त्याच नात्यांने मी परदेशात गेली होती. क्वांटिको'च्या प्रेमात पडले होते मी. मला फक्त 13 एपिसोड करायचे होते पणत्यानंतर त्याचे 26 एपिसोड झाले आणि नंतर 39 एपिसोड केले मी.
  
तू शेवटचा कोणता चित्रपट पाहिलास?
माझी कामाची वेळ विचित्र होती एवढे काम असायचे की मी ५:०० कामाला सुरुवात करायचे ते ०९:०० ला घरी परत जायचे. त्यामुळे मला अजिबात कुठलाही चित्रपट बघायला वेळ नसायचा. 

बेवॉचच्या टीमसोबत प्रमोशनसाठी तू भारतात येणार आहेस का?
खरे सांगायचे तर आता प्रमोशनसाठी आमच्याकडे फारसा वेळ राहिलेला नाही आणि बेवॉचची टीम प्रमोशनसाठी भारतात येणार नाही आहे. आम्ही याचा प्रीमियर मियामी आणि बर्लिनमध्ये करणार आहोत. मी ही सध्या टीव्ही इंटरव्ह्यूमध्ये बिझी आहे. आम्हाला जेवढे जास्त चित्रपटाचे प्रमोशन करता येईल तेवढे आम्ही करतोय.

एक निर्माती म्हणून तू कुठल्या प्रकारचे चित्रपट प्लॅन करते आहेस?
आमच्याकडे आता 6 चित्रपट आहेत ज्याच्यावर आम्हीत काम करतो आहोत. आम्ही सिक्कीमच्या लोकांवर चित्रपट  करतोय. सिक्कीममध्ये फिल्म इंडस्ट्री तेवढी विकसित नाही आहे. आम्ही सरकारच्या मदतीने तिथे सेटअप करतोय. मी काही लोकांशी याबाबत बोलणे सुरु आहे. जे तिथे राहून तिथल्या लोकांना चित्रपटाच्या तयार करण्याचे प्रशिक्षण देतील.  एकदा का तो प्रयत्न यशस्वी झाला की आम्ही तिथे भरपूर चित्रपट तयार करु शकतो. तिथे मोठ्या प्रमाणात स्थानिक कलाकार आहेत  आम्ही पंजाबी, बंगाली चित्रपट सुद्धा तयार करीत आहोत.

तू बेवॉचमध्ये एक खलनायिकेची भूमिका साकारत आहेस, ती करताना बॉलिवूडमधल्या एखाद्या खलनायिकेकडून त्यासाठी प्रेरणा घेतलीस का ? 
मी बॉलिवूडमध्येसुद्धा नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत, ऐतराज, सात खून माफ या चित्रपटा माझ्या ग्रे शेड भूमिका होत्या. आपलाकडे खलनायिका म्हणून फार कमी स्त्री कलाकार आहेत. अशा प्रकारच्या भूमिका करणे आव्हानात्मक असते असे काम। करायला मजा येते. मला वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात. 

Web Title: "It's more challenging to play a negative role"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.