चर्चा तर होणारच ! जाणून घ्या ‘मस्तानी’च्या हातामध्ये काय होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2017 11:10 IST2017-03-28T05:40:58+5:302017-03-28T11:10:58+5:30

बॉलिवूडमधील काही कलाकार आपण साकारत असलेल्या भूमिकेवर प्रचंड मेहनत घेतात. त्या भूमिकेत नेमकेपण आणि नेटकेपण यावं यासाठी हे कलाकार ...

It will be discussed! Learn what happens in the hands of 'Mastani'? | चर्चा तर होणारच ! जाणून घ्या ‘मस्तानी’च्या हातामध्ये काय होतं?

चर्चा तर होणारच ! जाणून घ्या ‘मस्तानी’च्या हातामध्ये काय होतं?

लिवूडमधील काही कलाकार आपण साकारत असलेल्या भूमिकेवर प्रचंड मेहनत घेतात. त्या भूमिकेत नेमकेपण आणि नेटकेपण यावं यासाठी हे कलाकार प्रयत्नांची पराकाष्टा करतात. मग ते एखादी भाषा शिकणे, बॉडी कमावणं, वजन कमी करणं असो किंवा मग अन्य कोणतीही गोष्ट.त्या भूमिकेसाठी काहीही करण्याची कलाकारांची तयारी असते. यांत प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान, खिलाडी अक्षय कुमार यांचा.मात्र परफेक्शन मिळवण्यासाठी आमिर किंवा अक्कीपेक्षा अभिनेत्रीही कमी नसल्याचे दाखवून दिलं आहे ते हिंदी चित्रपटसृष्टीच्या मस्तानीने अर्थात दीपिका पादुकोण हिने.बॉलिवूडच नाही तर हॉलीवुडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका गाजवलेली दीपिका पद्मावती या सिनेमाच्या शुटिंगमधून वेळ काढत मुंबईत दाखल झाली. कायमच आपल्या फॅशन स्टेटमेंटने दीपिका विमानतळावर फॅन्ससोबतच माध्यमाच्या कॅमे-याचं लक्ष आकर्षित करते. मात्र यावेळी आपल्या फॅशन किंवा स्टाईलने नाही तर एका खास कारणामुळे दीपिकानं सा-यांच्या नजरा आकर्षित केल्या.



दीपिकाची फॅशन, ड्रेसिंग स्टाईल नाही तर तिच्या हातात असलेल्या एका खास गोष्टीने तिथे असलेल्या प्रत्येकाचंच लक्ष वेधून घेतलं. दीपिकाच्या हातात भले मोठं आणि भले जाड पुस्तक होतं. हे पुस्तक पाहून अनेकजण चक्रावून गेले. हे कसलं पुस्तक आहे याबाबत अनेक चर्चा सुरु झाल्या. सुरुवातीला काहींना वाटलं हे पुस्तक कादंबरी किंवा मॅगझिन असेल. त्यावेळी हे पुस्तक कसले हे जाणून घेण्यासाठी कॅमेरामन्सनी त्यांच्या कॅमे-याच्या लेन्स झूम केल्या आणि त्यांच्या झूम केलेल्या कॅमे-याने त्या पुस्तकाची जवळून छबी टिपली. या फोटोवरुन दीपिकाच्या हातात असलेले पुस्तक राजस्थानच्या इतिहासाचं होतं. दीपिका आणि राजस्थानचा इतिहास असा प्रश्न कुणालाही पडणं स्वाभाविक आहे. याचं उत्तर हे दीपिकाचा आगामी सिनेमा पद्मावती. या सिनेमात दीपिका ऐतिहासिक भूमिका साकारत आहे. या भूमिकेची तयारी करण्यासाठी आणि तिचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी दीपिका सध्या बरीच मेहनत घेत आहे. कायमच आपल्या सिनेमातील भूमिकेबाबत दीपिका फारच चोखदंळ असते. त्यामुळे या भूमिकेत परफेक्टपणा यावा यासाठी वाट्टेल ते करण्याची दीपिकाची तयारी असते. पद्मावती सिनेमातील या भूमिकेसाठी सध्या दीपिका बराच अभ्यास करत आहे. ऐतिहासिक घटनांची संपूर्ण माहिती घेऊन भूमिकेसाठी दीपिका स्वतःला तयार करत आहे. बाजीराव मस्तानी या सिनेमातील मस्तानीला यश मिळाल्यानंतर दीपिका पुन्हा एकदा संजय लीला भन्साली यांच्या पद्मावती सिनेमातील रानी पद्मिनी ही भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी कोणतीही कमी राहू नये यासाठी दीपिका सध्या खूप मेहनत घेत असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलं आहे. 

Web Title: It will be discussed! Learn what happens in the hands of 'Mastani'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.