अशी सुरु झाली होती नेहा आणि अंगदीची लव्हस्टोरी, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 15:31 IST2018-05-10T10:01:09+5:302018-05-10T15:31:09+5:30

नेहाने आपला बेस्ट फ्रेंड असलेल्या अंगद बेदी सोबत सात फेरे घेतले आहेत. नेहाने पंजाबी रितीरिवाज प्रमाणे लग्न केले आहे. ...

It started with Neha and Kadhi Lovestori, read detailed | अशी सुरु झाली होती नेहा आणि अंगदीची लव्हस्टोरी, वाचा सविस्तर

अशी सुरु झाली होती नेहा आणि अंगदीची लव्हस्टोरी, वाचा सविस्तर

हाने आपला बेस्ट फ्रेंड असलेल्या अंगद बेदी सोबत सात फेरे घेतले आहेत. नेहाने पंजाबी रितीरिवाज प्रमाणे लग्न केले आहे. नेहाच्या आधी अंगदचे नाव ऋचा चढा आणि 'बिग बॉस' स्पर्धक असलेल्या नोरा फतेसोबत जोडण्यात आले होते. नोराशी ब्रेकअप झाल्यानंतर अंगद आणि नेहामध्ये जवळीकता वाढल्याचे कळतेय. या मैत्रिचे रुपातंर मग प्रेमात झाले. गेल्या एक वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत होते. मात्र दोघांनी आपले नातं कधी स्वीकारले नाही. अशातच लग्नाचे फोटो समोर आल्यामुळे सगळे आश्चर्यचकित झाले आहेत. नेहाने आपल्या फॅन्सना फोटो शेअर करुन चांगले सरप्राईज दिले. नेहा व अंगदने आजपर्यंत एकत्र काम केलेले नाही. पण काही कॉमन फ्रेन्ड्सच्या माध्यमातून त्यांची भेट झाल्याचे कळते. नेहाने गुपचुप दिल्लीत लग्न केल्याचे कळतेय. अंगद आणि नेहा दोघेही पंजाबी आहेत. अंगद सलमानसोबत टायगर जिंदा है मध्ये दिसला होता.  

ALSO READ :  Breaking News : सोनम कपूरनंतर बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री अडकली लग्न बंधनात

नेहा पेक्षा अंगद तीन वर्षांनी लहान आहे. अंगद हा पूर्व क्रिकेटर बिशन सिंह बेदी यांचा मुलगा आहे. अंगद दिल्लीच्या 19 वर्षीय संघातून क्रिकेट खेळला आहे.  शिमलाच्या बिशप कॉटन आणि दिल्लीच्या सेंट स्टीफेन कॉलेजमधून अंगदने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. अंगदने आपली सुरुवात मॉडलिंग पासून केली आहे. त्यानंतर  35 वर्षिय अंगद आलेल्या 'फाल्तू' चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. अंगदने काही कुकिंग शोमध्ये सुद्धा दिसला आहे. अंगद इमोशनल अत्याचार या शोचे अँकरिंग सुद्धा केले होते. फियर फॅक्टर सीजन तीन, खतरों के खिलाडी या शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसला होता. पिंकमध्ये अंगदने साकारलेली खलनायकाची भूमिका अंगावार काटे उभे करणारी होती. 

Web Title: It started with Neha and Kadhi Lovestori, read detailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.