​पुरुषांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारावर भाष्य करणाऱ्या चित्रपटात खलिद सिद्धीकी साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 11:36 IST2018-05-12T06:06:31+5:302018-05-12T11:36:31+5:30

मी टू मैं भी हा पुरुषांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारावर भाष्य करणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्त्रियांवर होणाऱ्या ...

It is the role of realizing Khalid Siddhi in the film that is about sex abuse on men | ​पुरुषांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारावर भाष्य करणाऱ्या चित्रपटात खलिद सिद्धीकी साकारणार ही भूमिका

​पुरुषांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारावर भाष्य करणाऱ्या चित्रपटात खलिद सिद्धीकी साकारणार ही भूमिका

टू मैं भी हा पुरुषांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारावर भाष्य करणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारावर आजवर अनेक चित्रपट आपण पाहिले आहेत. पण हा चित्रपट लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारावर भाष्य करणारा आहे. या चित्रपटात खलिद सिद्धीकी महत्त्वाची भूमिका साकारत असून खलिदने आजवर जॉगर्स पार्क, गजनी यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच साथ निभाना साथिया, रिश्ता लिखेंगे हम नया यांसारख्या मालिकांमध्ये देखील तो आपल्याला मुख्य भूमिकेत दिसला होता. तो आता मरियम खान... रिपोर्टिंग लाइव्ह या मालिकेत काम करणार आहे. या मालिकेच्या प्रमोशनच्यावेळी खालिदने दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या मी टू मैं भी या नव्या चित्रपटाविषयी माहिती दिली. खालिद सांगतो, मी टू मैं भी या चित्रपटात मी मुख्य भूमिका साकारत आहे. लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारावर हा चित्रपट आधारित असून तीन लहान मुलाची कथा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या तिन्ही मुलांवर लहानपणी लैंगिक अत्याचार झालेला आहे. या सगळ्याचा त्यांच्या मनावर विपरित परिणाम झाला आहे. ही मुले मोठी झाली असली तरी या गोष्टी विसरू शकलेले नाहीत. या चित्रपटात तीन मुलांपैकी एका मुलाच्या तरुणपणाची भूमिका मी साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्रान खान करणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण भोपाल येथे होणार आहे. खरे तर स्त्रियांप्रमाणे पुरुषांना देखील लैंगिक अत्याचारांना बळी पडावे लागते. पण आपल्या आयुष्यात असे काही झाले आहे असे सांगायला अनेक पुरुष घाबरतात किंवा त्यांना त्याची लाज वाटते. या चित्रपटानंतर लोकांमध्ये आणि विशेषतः लहान मुलांमध्ये या विषयाविषयी जनजागृती निर्माण होईल आणि लोक समोर येऊन या विषयावर बोलतील असे मला वाटते. सगळ्यांना मी टू या चळवळीविषयी माहीत असले तरी लोक याविषयी बोलायला घाबरतात. पण या चित्रपटामुळे लोकांनी बोलायला सुरुवात केली तर ते आमचे यश असेल असे मला वाटते. या चित्रपटातील माझी भूमिका आजवरच्या सगळ्या भूमिकांपेक्षा वेगळी असून मी एका गंभीर भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Also Read : बिग बी अमिताभ बच्चनहे आहेत ‘मरियम खान-रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेतीला या बालकलाकाराचे फॅन!

Web Title: It is the role of realizing Khalid Siddhi in the film that is about sex abuse on men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.