इतकी बोल्ड दिसतेय गोविंदाची ‘लाल दुपट्टेवाली’ हिरोईन... पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 19:53 IST2018-05-06T14:23:53+5:302018-05-06T19:53:53+5:30

सुपरस्टार गोविंदा भलेही मोठ्या पडद्यावरून गायब असला तरी, त्याचे ब्लॉकबस्टर चित्रपट आजही प्रेक्षक तेवढ्याच उत्सुकतेने बघत असतात. त्यातीलच त्याचा ...

It looks so bold that Govinda's 'Red Dapattavali' Heroine ... see photo! | इतकी बोल्ड दिसतेय गोविंदाची ‘लाल दुपट्टेवाली’ हिरोईन... पाहा फोटो!

इतकी बोल्ड दिसतेय गोविंदाची ‘लाल दुपट्टेवाली’ हिरोईन... पाहा फोटो!

परस्टार गोविंदा भलेही मोठ्या पडद्यावरून गायब असला तरी, त्याचे ब्लॉकबस्टर चित्रपट आजही प्रेक्षक तेवढ्याच उत्सुकतेने बघत असतात. त्यातीलच त्याचा ‘आॅँखे’ हा चित्रपट जेव्हा जेव्हा टीव्हीवर प्रदर्शित होतो तेव्हा-तेव्हा ‘लाल दुपट्टेवाली’ हे गाणे ओठांवर येते. या गाण्यात गोविंदासोबत झळकलेली अभिनेत्रीविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या अभिनेत्रीच्या लूकमध्ये प्रचंड बदल झाला असून, ती पहिल्यापेक्षाही अधिक बोल्ड दिसत आहे. ‘लाल दुपट्टेवाली’ या गाण्यातून प्रसिद्धीझोतात आलेली ही अभिनेत्री चित्रपटांमध्ये वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते ओम शिवपुरी यांची मुलगी आहे. 



१९९३ मध्ये आलेल्या ‘आॅँखे’ या चित्रपटातून रितू शिवपुरी हिने आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र अशातही रितू फिल्मी दुनियेत म्हणावा तसा प्रभाव टाकू शकली नाही. बॉलिवूडमध्ये अपेक्षित असे यश मिळाले नसल्याने रितू कन्नड चित्रपटांकडे वळाली. याठिकाणी तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. रितूचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर वाºयासारखा व्हायरल होत असतो. ती आपल्या चाहत्यांसाठी नियमितपणे फोटो अपलोड करीत असते. 









खरं तर ९० च्या दशकातच रितूची चर्चा एक बोल्ड अभिनेत्री म्हणून केली जायची. तब्बल २५ वर्षांनंतरही तिचे सौंदर्य तसुभरही घटले नाही. उलट ती दिवसागणिक सुंदर होत गेली. रितूचे वय ४३ वर्षं आहे. परंतु अजूनही तिच्या अदा घायाळ करणाºया आहेत. सध्या ती टीव्ही मालिकेत बघावयास मिळत आहे. ‘इस प्यार को क्या नाम दूॅँ’ या मालिकेत ती आईची भूमिका साकारत आहे. रितूने आपल्या १३ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये १६ चित्रपटांमध्ये काम केले. यामध्ये कन्नड चित्रपटांचा अधिक समावेश आहे.  

Web Title: It looks so bold that Govinda's 'Red Dapattavali' Heroine ... see photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.