​बॉलिवूडमध्ये बदललेली ही गोष्ट सुनील शेट्टीला अजिबात आवडत नाही असे तो सांगतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 17:09 IST2016-11-09T17:09:17+5:302016-11-09T17:09:17+5:30

सुनील शेट्टी सध्या दाढी आणि मिशी वाढवलेल्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे. हा त्याचा डॅशिंग लूक त्याच्या नव्या चित्रपटासाठी आहे ...

It is heard that Sunil Shetty does not like the fact that Bollywood has changed | ​बॉलिवूडमध्ये बदललेली ही गोष्ट सुनील शेट्टीला अजिबात आवडत नाही असे तो सांगतोय

​बॉलिवूडमध्ये बदललेली ही गोष्ट सुनील शेट्टीला अजिबात आवडत नाही असे तो सांगतोय

नील शेट्टी सध्या दाढी आणि मिशी वाढवलेल्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे. हा त्याचा डॅशिंग लूक त्याच्या नव्या चित्रपटासाठी आहे असे तो सांगतो. गेली अनेक वर्षं तो बॉलिवूडमध्ये काम करत असल्याने इथे करियर करण्यासाठी किती स्ट्रगल करावा लागतो याची त्याला चांगलीच कल्पना आहे. त्यामुळे त्याने नव्या टायलेंटला संधी देण्यासाठी 'एफ द काऊज' ही ऑनलाइन वेबसाइट सुरू केली आहे. या वेबसाईटबाबत सुनील शेट्टीने सीएनएक्ससोबत मारलेल्या गप्पा...

एफ द काऊच ही वेबसाईट सुरू करण्याचा विचार कधी केला आणि यात कोणकोणत्या गोष्टी असणार आहेत?
अभिनय करायला मिळावा यासाठी अनेक तास ऑडिशनसाठी थांबणारे लोक मी पाहिले आहेत. यांच्यासाठी काहीतरी करावे असे माझ्या कित्येक दिवसांपासून डोक्यात सुरू होते. एक-दीड वर्षांपूर्वी मी या प्रोजेक्टविषयी विचार केला आणि मुकेश छाब्रासोबत यावर काम करायला सुरुवात केली. या वेबसाईटवर लोकांनी त्यांचे प्रोफाईल आणि व्हिडीओ पोस्ट करायचे. तसेच ऑडिशनदेखील ऑनलाइनच घेतली जाईल. त्यामुळे पूर्णपणे ऑडिशन होईपर्यंत लोकांना मुंबईत येण्याचीही गरज नाहीये. या वेबसाईटवरच व्हिडीओ कशाप्रकारे चित्रीत करायचा, मेकअप कसा करायचा, ऑडिशन कशाप्रकारे द्यायचे हे सगळे आम्ही शिकवणार आहोत. तसेच कमीत कमी किंमतीत आम्ही पोर्टपोलिओदेखील करून देणार आहोत. याद्वारे इंडस्ट्रीत काम करण्यास उत्सुक असलेल्यांना आम्ही एक व्यासपीठ मिळवून देणार आहोत. तसेच देशातील, परदेशातील शूटिंग लोकेशनविषयीदेखील येथे माहिती उपलब्ध असणार आहे. सगळ्या तंत्रज्ञानांनादेखील या वेबसाईटवर काम मिळेल. आमच्या या एन्टरटेन्मेंट सेक्टरमध्ये कशाचाच ताळमेळ नसतो, तोच आम्ही घालण्याचा प्रयत्न करणार आहोत. थोडक्यात सांगायचे झाले तर एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीत काम मिळवून देणारी आम्ही वेबासाईट सुरू करत आहोत.

तू अनेकवर्षं या इंडस्ट्रीचा भाग आहेस, या इंडस्ट्रीमध्ये इतक्या वर्षांत काय फरक जाणवतो?
सेटवरील वातावरणात आज पूर्णपणे बदल झालेला आहे. पूर्वी आम्ही आऊटडोरला गेलो की, संध्याकाळी सगळे एकत्र येऊन क्रिकेट खेळत असू. ज्यांना क्रिकेट येत नाही ते खेळ पाहायला तरी येत असत. पण आता असे काहीच राहिलेले नाही. तसेच सध्या चित्रपट लोक नाही तर मशिन बनवत आहेत असे माझे मत आहे. आजकाल एखादा अभिनेता, दिग्दर्शक चालला नाही तर त्याला दुसरी संधी दिली जात नाही. पण आमच्यावेळी आम्हाला किती संधी मिळाल्या. त्यामुळे आम्हाला इथे पोहोचता आले. तसेच एजंट हा प्रकार सध्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे. चित्रपटांविषयी काहीही कळत नसलेले लोक स्क्रिप्ट वाचून ती निर्मात्यांनी वाचावी की नाही हा निर्णय घेतात. त्यामुळे हे सगळे बदलण्याची गरज आहे. 

तू तीन वर्षं चित्रपटांमधून ब्रेक घेतला होतास. पण आता तू कोणत्या चित्रपटात झळकणार आहेस?
रिलोडेड या चित्रपटात प्रेक्षकांना मी पुन्हा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील माझा लूक खूप वेगळा असणार आहे. तसेच मला अनेक चित्रपटांच्या सध्या ऑफर्स येत आहेत. पण मला भूमिका आवडत नसल्याने मी अनेक चित्रपटांना नकार देत आहे. माझ्या वयाला साजेशाच भूमिका मला साकारायच्या आहेत. सध्या एक-दोन चित्रपटांवर चर्चा सुरू आहे. त्यामुळे प्रेक्षकांना लवकरच माझे चित्रपट पाहायला मिळतील. पण सध्या मी माझ्या करियरपेक्षा माझा मुलगा आहानच्या करियरवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. मी स्वतः त्याच्या प्रत्येक गोष्टींकडे बारीक लक्ष देणार आहे. तुला चित्रपट करायचा की नाही हे तुझे तू ठरव. पण चित्रपटाची कथा लोकांना एकदा तरी भेटून ऐक हे मी त्याला नक्कीच सांगणार आहे. त्याने थेट लोकांशी संवाद साधावा, त्याचे काम कोणत्याही एजंटने सांभाळावे अशी माझी इच्छा नाहीये.  

मराठी चित्रपटात तू काम करणार अशी कित्येक वर्षांपासून चर्चा आहे. तू मराठी चित्रपटात कधी झळकणार आहेस?
आज बॉलिवूडपेक्षा प्रादेशिक चित्रपट खूप चांगले काम करत आहे. मराठीत काम करण्याची माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. अजय फणसेकरच्या एका चित्रपटात मी काम करत असून हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये तयार केला जाणार आहे. 

Web Title: It is heard that Sunil Shetty does not like the fact that Bollywood has changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.