लवकरच रूपेरी पडद्यावर परतणार इरफान खान!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 11:56 AM2019-02-13T11:56:33+5:302019-02-13T11:58:09+5:30

बॉलिवूड अभिनेता इरफान खान याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, लंडनमध्ये कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर इरफान मुंबईत परतला आहे.

irrfan khan to start hindi medium sequel shoot from this month | लवकरच रूपेरी पडद्यावर परतणार इरफान खान!

लवकरच रूपेरी पडद्यावर परतणार इरफान खान!

googlenewsNext
ठळक मुद्देरफान खान एंडोक्राईन ट्यूमर या दुर्धर आजाराने पीडित आहे. गतवर्षी मार्चमध्ये  इरफानने आपल्या आजाराबाबत ट्विटर अकाऊंटवरुन खुलासा केला होता.

बॉलिवूड अभिनेता इरफान खान याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, लंडनमध्ये कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर इरफान मुंबईत परतला असून तूर्तास येथील एका रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याचदरम्यान इरफान कामावर परतणार असल्याचेही कळतेय.
ताजी बातमी खरी मानाल तर, येत्या २२ तारेखेपासून इरफान कामावर परतणार असून ‘हिंदी मीडियम’च्या सीक्वलचे शूटींग सुरु करणार आहे. कॉस्च्युम डिझाइनर्सनी इरफानच्या आऊटफिटवर काम सुरु केले आहे. अर्थात अद्याप या चित्रपटाची हिरोईन ठरलेली नाही. मध्यंतरी या चित्रपटात इरफानच्या अपोझिट करिना कपूरला कास्ट करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र करिनाने तूर्तास कुठलाही खुलासा केलेला नाही.


२०१७ मध्ये ‘हिंदी मीडियम’ प्रदर्शित झाला होता. यात इरफानच्या अपोझिट पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर दिसली होती. भारतीय शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणाºया या चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. इरफान व सबाची केमिस्ट्रीही जमून आली होती. पण पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी लादण्यात आल्याने ‘हिंदी मीडियम’च्या सीक्वलमध्ये पुन्हा एकदा सबा कमरला कास्ट करणे शक्य नाही. त्यामुळे या सीक्वलसाठी नव्या हिरोईनचा शोध सुरु आहे.


इरफान खान एंडोक्राईन ट्यूमर या दुर्धर आजाराने पीडित आहे. गतवर्षी मार्चमध्ये  इरफानने आपल्या आजाराबाबत ट्विटर अकाऊंटवरुन खुलासा केला होता.  त्याने एक सावलीचा फोटो शेअर करत सोबत एक इमोशनल पोस्ट लिहिली होती. ‘परमेश्वर आपल्यासोबत गुपचूप चालतो आणि तितक्याच हळूवार आपल्यासोबत बोलतो.  तो एका जळत्या वातीसारखा आहे. ज्याच्या सावलीखाली आपण चालत असतो. आयुष्यात जे काही होतंय, ते होऊ द्या. मग ते चांगले असो वा वाईट. फक्त चालत राहा. कारण कुठलीही भावना अखेरची नाही. यालाच आयुष्य म्हणतात...’ असे त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते.

Web Title: irrfan khan to start hindi medium sequel shoot from this month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.