इरफान खान करणार नव्या इनिंगची सुरुवात... काय आहे ही इनिंग जाणून घ्या !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2017 09:54 IST2017-04-01T04:24:51+5:302017-04-01T09:54:51+5:30
अभिनेता इरफान खान हा संवेदनशील आणि तितकाच गुणी अभिनेता आहे. त्यानं साकारलेल्या विविध भूमिका रसिकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. त्याच्या ...

इरफान खान करणार नव्या इनिंगची सुरुवात... काय आहे ही इनिंग जाणून घ्या !
अ िनेता इरफान खान हा संवेदनशील आणि तितकाच गुणी अभिनेता आहे. त्यानं साकारलेल्या विविध भूमिका रसिकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. त्याच्या अभिनयात अशी काय जादू आहे की एखादी सरळ, साधी भूमिकाही रसिकांच्या काळजात घर करुन जाते. मग ते पीकू सिनेमातील हल्का फुल्का रोमान्स असो किंवा मग जुरासिक वर्ल्ड या सिनेमातील इरफानने साकारलेली लक्षवेधी भूमिका. त्याच्या प्रत्येक सिनेमाला भारतातच नाही तर जगभरातील रसिकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे. अभिनयात आपलं वर्चस्व सिद्ध केल्यानंतर आता इरफान खान बहुदा आपल्या नव्या इनिंगसाठी सज्ज होत आहे. अभिनयसोबतच संगीताच्या दुनियेत जादू दाखवण्यासाठी इरफानची तयारी सुरु आहे. इरफानचे संगीत प्रेम त्याच्या एका फोटोमुळे जगासमोर आले आहे. बेनी कॅप परिधान करुन इरफान एका संगीत रेकॉर्डिंग रुममध्ये पाहायला मिळाला. यावेळी इरफान तिथे एकटा नव्हता. त्याच्यासोबत संगीत क्षेत्रातील दिग्गज त्याच्या जोडीला होते. पापोन आणि अनु मलिक यांच्यासोबत इरफान या रेकॉर्डिंग रुममध्ये असल्याचे या फोटोवरुन समोर आलं आहे. आता या दोघांसोबत इरफान तिथे काय करतो हे जरी गुलदस्त्यात असलं तरी फोटो बरंच काही सांगून जातो नाही का ? संगीत क्षेत्रातील या दोन दिग्गजांसह इरफान खान आपल्या इनिंगची सुरुवात करत आहे हेच या फोटोवरुन सिद्ध होत आहे. अभिनय क्षेत्र गाजवल्यानंतर आपल्या सूरांची जादू पसरवण्याची तयारीच इरफानने केली आहे. या नव्या इनिंगची इरफानकडून तयारी सुरु आहे. या नव्या इनिंगची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र अभिनयानं मनं जिंकलेला इरफान आपल्या सूरेल इनिंगनेही रसिकांवर मोहिनी घातल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्याच्या फॅन्सना नक्कीच असेल.