मी प्रेग्नेंट आहे, मरण पावलेले नाही... करिना मीडियावर वैतागली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2016 17:45 IST2016-07-18T12:15:30+5:302016-07-18T17:45:30+5:30
करिना कपूर प्रेग्नेंट असल्याची बातमी आली आणि चर्चांना जोर चढला. करिना प्रेग्नेंट आहे, मग कुठले चित्रपट करणार, कुठले नाकारणार, ...

मी प्रेग्नेंट आहे, मरण पावलेले नाही... करिना मीडियावर वैतागली
क िना कपूर प्रेग्नेंट असल्याची बातमी आली आणि चर्चांना जोर चढला. करिना प्रेग्नेंट आहे, मग कुठले चित्रपट करणार, कुठले नाकारणार, तिच्या करिअरवर काय परिणाम होणार, अशा काय काय चर्चा मीडियात रंगल्या. खरे तर, करिना या चर्चांना अक्षरश: वैतागली आहे. होय, प्रसारमाध्यमांकडून तिच्या प्रेग्नेंसीबाबत होत असलेल्या विविध चर्चांबद्दल करिनाने नाराजी व्यक्त केली आहे. मी गरोदर आहे, मरण पावलेले नाही. आणि प्रसूती ब्रेक (मेटर्निटी लिव्ह) काय असतो? बाळाला जन्म देण्याची ही साधी सरळ गोष्ट आहे. प्रसारमाध्यमांनी मला अशी वेगळी वागणूक देणं आता बंद करायला हवे. ज्यांना या गोष्टीने फरक पडतो त्यांनी माझ्यासोबत काम करू नये. माझे काम जसे आहे तसेच राहिल. एखाद्या राष्ट्रीय दुर्घटनेप्रमाणे या गोष्टीची चर्चा करणे बंद करा.आपण २१ व्या शतकात राहतोयं, १९ व्या शतकात नाही. १९ शतकातील लोकही माध्यमांपेक्षा सुसंस्कृत आणि सामान्य होती. माझं गरोदर असणं हे जणू काही लग्न आणि कुटुंब विस्ताराचा करियरशी काहीच संबंध नसल्याचा संदेश बनला आहे, अशा शब्दांत करिनाने माध्यमांचा समाचार घेतला.अर्थात करिनाने माध्यमांवर भडकण्याची ही काही पहिली वेळ नाही.काही वर्षांपूर्वी ती झिरो साइज फिगरमुळे चर्चेत आली होती. त्यावेळी तिच्याबाबात अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. त्यावरून तिने माध्यमांना चांगलेच फटकारले होते.