मी कलाकार, कार्यकर्ती नव्हे -तनिष्ठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 17:49 IST2016-11-25T17:44:08+5:302016-11-25T17:49:08+5:30

‘सामाजिक विषयांवर आधारित चित्रपटांमध्ये मी काम केले असले तरीही मी काही कुठली कार्यकर्ती नाहीये, मी एक कलाकार आहे. माझ्या ...

I'm not an artist, a worker-integrity | मी कलाकार, कार्यकर्ती नव्हे -तनिष्ठा

मी कलाकार, कार्यकर्ती नव्हे -तनिष्ठा

ामाजिक विषयांवर आधारित चित्रपटांमध्ये मी काम केले असले तरीही मी काही कुठली कार्यकर्ती नाहीये, मी एक कलाकार आहे. माझ्या चित्रपटांमुळे सामाजिक बदल होणे अपेक्षित असेल तर तो नक्की व्हावा, पण लोकांनी मला कार्यकर्ती समजू नये. समाजासाठी मी काही करू शकले नाही तरी चित्रपटातून जागृती करण्याचा प्रयत्न नक्की करते,’ असा खुलासा तनिष्ठा चॅटर्जी या अभिनेत्रीने केला. ‘पार्च्ड’ या चित्रपट तिला  पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये घेऊन आला. 



पार्च्डचा अनुभव शेअर करताना ती म्हणते,‘एखादा चित्रपट करताना ही आपल्यासाठी बॉलिवूडची एन्ट्री आहे म्हणून आपण करत नाही तर स्टोरीत काहीतरी विषय असेल यासाठी चित्रपटाची निवड होते. अजय देवगण ‘पार्च्ड’चा निर्माता असल्याने चित्रपटाचे प्रमोशन करणे खुपच सोपे झाले. या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहात मला येता येईल असा विचार कधीही केला नव्हता. तरीही चित्रपटाचे समीक्षण आणि चाहत्यांचा प्रतिसाद बराच मिळाला.’ 

लीना यादव दिग्दर्शित या चित्रपटात राधिका आपटे आणि सुरवीन चावला या होत्या. ही ४ महिलांची कथा असून त्यांच्या संघर्षाची कहानी चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. तनिष्ठा चॅटर्जीने हिंदी चित्रपटसृष्टीत काही मोजके चित्रपट केले पण, नोंद घ्यावी असा हा एकच तिचा चित्रपट सामाजिक जाणिवांना बोलतं करणारा आहे. 

Web Title: I'm not an artist, a worker-integrity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.