IIFA Awards 2018 : आयफाच्या मुख्य समारोहात ग्रीन कार्पेटवर अवतरले तारांगण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 21:19 IST2018-06-24T20:30:09+5:302018-06-24T21:19:04+5:30

 थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आयफा अवार्ड्स 2018ची आजच्या मुख्य रात्रीची रंगत हळूहळू वाढू लागली आहे. ...

IIFA Awards 2018: At the main event of the IIFA, | IIFA Awards 2018 : आयफाच्या मुख्य समारोहात ग्रीन कार्पेटवर अवतरले तारांगण

IIFA Awards 2018 : आयफाच्या मुख्य समारोहात ग्रीन कार्पेटवर अवतरले तारांगण

 
ायलंडची राजधानी बँकॉकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आयफा अवार्ड्स 2018ची आजच्या मुख्य रात्रीची रंगत हळूहळू वाढू लागली आहे. बॉलिवूडच्या सेलिब्रिटी, विदेशाच्या धरतीवरील बॉलिवूड सेलिब्रिटी असे सगळेच आजच्या या रात्रीकडे डोळे लावून बसले होते. तासागणिक उत्साह शिगेला पोहोचत असताना, या रात्रीची धामधूम सुरू झाली आणि सगळीकडे उत्साह पसरला. सर्वात आधी बॉलिवूड स्टार्सची ग्लॅमरस एन्ट्री झाली. आयफाच्या ग्रीन कार्पेटवर एका पाठोपाठ एक तारे अवतरले. 



अभिनेत्री श्रद्धा कपूर पिंक कलरच्या गाऊनमध्ये आयफाच्या ग्रीन कार्पेटवर अवतरली आणि सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या.



  अभिनेता कार्तिक आर्यन ग्रीन कार्पेटवर दिसला.  कार्तिक आर्यन दिग्दर्शक करण जोहरसोबत आजचा हा रंगारंग कार्यक्रम होस्ट करतोय.



डिझाईनर सूट परिधान करून अभिनेता बॉबी देओल ग्रीन कार्पेटवर उतरला.



सीक्रेट सुपरस्टार फेम जायरा वसीम हिनेही आयफाच्या ग्रीन कार्पेटवर शानदार एन्ट्री घेतली.



अभिनेता अनिल कपूर यांनीही ग्रीन कार्पेटवर स्टाईलिश एन्ट्री घेतली.



अभिनेता अर्जुन कपूर आयफाच्या मुख्य समारोहात भाग घेणार की नाही, याबद्दल जरा शंका होती. कारण गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती ठिक नव्हती. पण तोही ग्रीन कार्पेटवर दिसला अन् त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला.  

Web Title: IIFA Awards 2018: At the main event of the IIFA,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.