​ मी कधीच ऐश्वर्याला मारहाण केली नाही; हे आत्ता का सांगतोय सलमान खान ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2017 10:31 IST2017-03-17T04:38:24+5:302017-03-17T10:31:08+5:30

सलमान खान व ऐश्वर्या राय या दोघांच्या लव्ह स्टोरीचा एक अध्याय कधीच विसरला जाऊ शकत नाही. आता नव्याने हा ...

I never beat Aishwarya; Why are you saying right now Salman Khan? | ​ मी कधीच ऐश्वर्याला मारहाण केली नाही; हे आत्ता का सांगतोय सलमान खान ?

​ मी कधीच ऐश्वर्याला मारहाण केली नाही; हे आत्ता का सांगतोय सलमान खान ?

मान खान व ऐश्वर्या राय या दोघांच्या लव्ह स्टोरीचा एक अध्याय कधीच विसरला जाऊ शकत नाही. आता नव्याने हा अध्याय आठवण्याचे कारण म्हणजे, सलमान खान याची एक जुनी मुलाखत. होय, सध्या इंटरनेटवर सलमानची एक जुनी मुलाखत व्हायरल झाली आहे. सन २००२ मध्ये एका दैनिकास त्याने ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीत सलमान ऐश्वर्या रायला मारहाण केल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देतो आहे.



मी ऐश्वर्याला कधीही मारलेले नाही. मी दिग्दर्शक सुभाष घई यांना थप्पड मारलीय. पण ऐश्वर्याला मारहाण केलेली नाही. कुणीही मला मारू शकतो. सेटवर हजर असलेला कुठलाही फायटर माझी पिटाई करू शकतो.त्यामुळे लोक मला घाबरत नाहीत. मी लगेच इमोशनल होतो. यानंतर स्वत:ला त्रास करून घेतो. भींतीवर डोके आपटतो. मी दुसºयाला त्रास देत नाही. मी सुभाष घईला थप्पड मारली, हे खरे असले तरी दुसºयाच दिवशी मी त्यांची माफीही मागितली होती.



कधीकधी तुम्ही तुमचा संयम गमावून बसला. सुभाष घईने मला चमच्याने मारले. माझ्या चेहºयावर तो प्लेट तोडायला तयार होता. माझी मानगुट त्याने पकडली होती. त्यामुळेच मी सुद्धा संतापलो आणि रागाच्या भरात जे करायला नको ते करून बसलो,असे सलमान याठिकाणी म्हणतोय. सुभाष घई यांच्या ‘ताल’ चित्रपटात ऐश्वर्या काम करत होती.



ALSO READ : OMG!! ​सलमान खानने का कमी केले १७ किलो वजन?

२००२ मध्येच सलमान व ऐश्वर्याचे ब्रेकअप झाले होते. १९९९ मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’मध्ये सलमान व ऐश्वर्या काम करत होते. याच चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये प्रेमाची खिचडी पकली होती. पण २००२ मध्ये ‘हम तुम्हारे है सनम’च्या रिलीजनंतर दोघांच्याही वाटा वेगवेगळ्या झाल्या. दोघांच्याही ब्रेकअपचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. पण ऐश्वर्याने कथितरित्या सलमानवर मारहाण केल्याचा आरोप केला होता.

Web Title: I never beat Aishwarya; Why are you saying right now Salman Khan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.