मला उत्कृष्ट चित्रपटाची प्रतीक्षा- शाहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 15:24 IST2016-10-25T15:22:09+5:302016-10-25T15:24:54+5:30

‘हैदर’,‘उडता पंजाब’ या चित्रपटांमधील अभिनेता शाहीद कपूर याचा अभिनय समीक्षकांसह चाहत्यांनीही वाखाणला. भूमिका कुठलीही असो, शाहीद त्यासाठी प्रचंड मेहनत ...

I look forward to the best movie - Shahid | मला उत्कृष्ट चित्रपटाची प्रतीक्षा- शाहीद

मला उत्कृष्ट चित्रपटाची प्रतीक्षा- शाहीद

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">‘हैदर’,‘उडता पंजाब’ या चित्रपटांमधील अभिनेता शाहीद कपूर याचा अभिनय समीक्षकांसह चाहत्यांनीही वाखाणला. भूमिका कुठलीही असो, शाहीद त्यासाठी प्रचंड मेहनत घेतो. खरे तर शाहीदने त्याच्या लहानशा कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस चित्रपट दिलेत. पण तरीही तो समाधानी नाहीय. होय, माझा बेस्ट चित्रपट अजूनही प्रदर्शित व्हायचाय. माझा हा बेस्ट चित्रपट चाहत्यांना कधी पाहायला मिळतो, याची मला प्रतीक्षा आहे, असे तो म्हणतो.  

विशाल भारद्वाज आणि शाहीद कपूर यांची जोडी ही उत्कृष्ट ‘दिग्दर्शक-अभिनेता’ म्हणून ओळखली जाते. सध्या ही जोडी तिसºयादा ‘रंगून’ चित्रपटासाठी एकत्र आली आहे. ‘रंगून’बद्दल शाहिद स्वत:ही प्रचंड नर्व्हस आहे. त्यामुळेच त्याने भारद्वाज यांना चित्रपट दाखवण्याची विनंती केली.

मात्र, चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम बाकी असल्याने भारद्वाज हतबल असल्याचे जाणवतेय. सध्या शाहीद ‘पद्मावती’साठी देखील तेवढाच चर्चेत आहे. संजय लीला भन्साळी यांचा हा चित्रपटही बराच चर्चेत आहे. पाहूयात रणवीर सिंग आणि दिपीका पादुकोण यांच्या लव्हस्टोरीत शाहीदची डाळ किती शिजतेय ते!

Web Title: I look forward to the best movie - Shahid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.