कबीरच्या चित्रपटात हृतिक रोशनला हवी कॅटरिना कैफ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 14:05 IST2017-03-19T08:35:50+5:302017-03-19T14:05:50+5:30
‘काबील’ने हृतिक रोशनच्या करिअरला वेग दिलाय, यात काहीही शंका नाही. काही फ्लॉप चित्रपटानंतर ‘काबील’च्या निमित्ताने हृतिकला यशाची चव चाखायला ...

कबीरच्या चित्रपटात हृतिक रोशनला हवी कॅटरिना कैफ!
‘ ाबील’ने हृतिक रोशनच्या करिअरला वेग दिलाय, यात काहीही शंका नाही. काही फ्लॉप चित्रपटानंतर ‘काबील’च्या निमित्ताने हृतिकला यशाची चव चाखायला मिळाली. पण ‘काबील’नंतर हृतिक चित्रपटाची निवड अतिशय विचारपूर्वक करू लागलाय. मीडियाचे मानाल तर, कबीर खानच्या पुढच्या सिनेमात हृतिकची वर्णी लागलीय. हा चित्रपटही युद्धावर आधारित आहे. साहजिक हृतिकने यासाठी मेहनत सुरु केलीय. याचेच फळ म्हणजे, कबीर खानने हृतिकला एक स्वातंत्र्य देऊ केले आहे. कसले माहितीय? या चित्रपटात आपल्या आवडीची हिरोईन निवडायचे. आता इतके स्वातंत्र्य मिळाल्यावर कोण नाही म्हणेल. हृतिकनेही त्याची आवड कळवून टाकलीय म्हणे. होय, या चित्रपटात कॅटरिना कैफ असावी, असे हृतिकला वाटते आहे.
ALSO READ : अक्षय कुमारऐवजी हृतिक रोशन करणार का ‘कथ्थी’ रिमेक?
हृतिकच्या या चित्रपटासाठी दीपिका पादुकोण, कॅटरिना आणि क्रिती सेनॉन यांच्या रस्सीखेच चालली होती. अशात सगळा निर्णय हृतिकवर अवलंबून होता. हृतिक म्हणेल, तिचे पारडे जड होणार होते. अखेर हृतिकच्या इच्छेनुसार, कॅटरिना या चित्रपटात दिसणार असल्याचे कळतेय. असे झाल्यास, हृतिक व कॅटचा हा तिसरा चित्रपट असेल. याआधी ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आणि ‘बँग बँग’ या चित्रपटात ही जोडी एकत्र दिसली होती. हे चित्रपट सुपरहिट ठरले होते. त्यामुळे आता कबीरच्या नव्या चित्रपटात या जोडीला पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. अर्थात हृतिक व कॅटचा आॅनस्क्रीन रोमान्स आपण पाहिलायं. या चित्रपटात कॅटऐवजी दीपिका असतील तर वेगळीच मजा आली असती. पण शेवटी निर्णय घेणारे आपण कोण? हृतिकने आपली हिरोईन निवडली म्हटल्यावर कोण काय बोलणार?