हृतिक रोशन गर्लफ्रेंड सबा आझादसोबत बांधणार लग्नगाठ?, नात्याला देणार नवं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 10:36 AM2023-07-06T10:36:25+5:302023-07-07T09:10:30+5:30

पहिली पत्नी सुझान खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर ह्रतिकच्या आयुष्यात सबाची एंट्री झाली.

Hrithik roshan and saba azad are planning to settle down and tie the knot very soon | हृतिक रोशन गर्लफ्रेंड सबा आझादसोबत बांधणार लग्नगाठ?, नात्याला देणार नवं नाव

हृतिक रोशन गर्लफ्रेंड सबा आझादसोबत बांधणार लग्नगाठ?, नात्याला देणार नवं नाव

googlenewsNext

Rakesh Roshan On Hrithik Saba Wedding Rumours: अभिनेता  हृतिक रोशन आणि सबा आझाद अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या कपलला अनेकदा इव्हेंटमध्ये एकत्र पाहिले जाते. हृतिक आणि सबा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत.  हृतिक आणि सबा आपल्या नात्याला पुढे घेऊन जाण्याच्या विचारात आहेत. 

पहिली पत्नी सुझान खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर ह्रतिकच्या आयुष्यात सबाची एंट्री झाली. अमर उजालाच्या रिपोर्टनुसार दोघे लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र हे दोघे कधी आणि कुठे लग्न करणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र दोघेही लवकरात लवकर लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

ह्रतिकने सबाची त्याच्या कुटुंबाशी आधीच ओळख करून दिली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच दोघांच्या लग्नाच्या बातम्यांसमोर आल्या होत्या. मात्र, त्यावेळी राकेश रोशन यांनी आपल्याला यासगळ्याबाबत कल्पना नसल्याचं सांगितलं होतं.

हृतिक आणि सबा खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी त्यांचं नातं ऑफिशियल  केलं. ते अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसाठी पोस्ट शेअर करतात. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, अभिनेता आणि सबा यांची भेट एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली होती.

वर्क फ्रंटवर, हृतिक रोशन दीपिका पादुकोण, अनिल कपूर आणि अक्षय ओबेरॉय यांच्यासोबत 'फाइटर'मध्ये दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा फर्स्टलूक रिलीज झाला. हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. 'फाइटर' हा देशातील पहिला एरियल अॅक्शन फ्रँचायझी चित्रपट आहे. 
 

Web Title: Hrithik roshan and saba azad are planning to settle down and tie the knot very soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.