HOTNESS ALERT : ​हॉट दिशा पटानीचा आणखी एक बोल्ड लूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 10:53 IST2017-03-15T05:20:42+5:302017-03-15T10:53:04+5:30

टायगर श्रॉफची कथित गर्लफ्रेन्ड दिशा पटानी आजघडीला बॉलिवूडची हॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जातेय. तिच्या या हॉट अ‍ॅण्ड बोल्ड लूकला साजेसा एक फोटो दिशाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

HOTNESS ALERT: Hot Direction Patani's bold look! | HOTNESS ALERT : ​हॉट दिशा पटानीचा आणखी एक बोल्ड लूक!

HOTNESS ALERT : ​हॉट दिशा पटानीचा आणखी एक बोल्ड लूक!

यगर श्रॉफची कथित गर्लफ्रेन्ड दिशा पटानी आजघडीला बॉलिवूडची हॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जातेय. तिच्या या हॉट अ‍ॅण्ड बोल्ड लूकला साजेसा एक फोटो दिशाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत दिशा पीच कलरच्या हॉट बिकनीत दिसेतेय. या फोटोत हॉट दिशा बीचजवळ एकटीच उभी आहे. या फोटोला दिशाने “Beach life.. missing the breeze?” असे कॅप्शन दिले आहे.



अलीकडे फिल्मफेअर अवार्ड फंक्शनमध्ये दिशा एकदम बोल्ड लूकमध्ये दिसली होती. तिच्या या बोल्ड लूकची चांगलीच चर्चा झाली होती.  या इव्हेंटमध्ये ती ओपन ड्रेस घालून पोहोचली होती. यानंतर सोशल मीडियावर तिला नाही नाही ते ऐकावे लागले. अर्थात दिशानेही याला तशाच शब्दांत उत्तर दिले.  कुठल्याही महिलेला तिच्या कपड्यांवरून जज करणे सोपे आहे. पण ही घाणेरडी मानसिकता मान्य करण्याची हिंमत अनेकांत नाही.  मला तुम्ही माज्या बॉडीचा जो पार्ट कवर करायला सांगत आहात, आधी तुम्ही त्याकडे पाहणे बंद करा, अशा शब्दांत दिशाने तिच्यावर अश्लिल कमेंट करणाºयांना फटकारले होते. दिशाने गतवर्षी ‘एम एस धोनी: दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला होता. सुशांतसिंह राजपूत या चित्रपटात तिचा हिरो होता. यानंतर ‘कुंग फू योगा’ या इंटरनॅशनल चित्रपटात ती जॅकी चॅनसोबत दिसली होती.

ALSO READ : Shameful : टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पाटनीच्या बोल्ड लूकवर लट्टू झाली 'ही' व्यक्ती!

दिशा बॉलिवूडमध्ये येण्याआधीपासून तिचे नाव टायगर श्रॉफ याच्याशी जोडले गेले आहे. टायगर व दिशा अनेकदा एकत्र दिसले. अर्थात दोघांनीही आम्ही केवळ चांगले मित्र असल्याचे सांगून प्रत्येक वेळ मारून नेली आहे. 

Web Title: HOTNESS ALERT: Hot Direction Patani's bold look!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.