सुझैन, मलायका अरोरा आणि बिपाशा बासूचा हॉट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2017 12:20 IST2017-05-03T06:42:31+5:302017-05-03T12:20:04+5:30

सुझैन, बिपाशा बासू आणि मलायका अरोरा या नेहमीच त्यांच्या फॅशन्ससेंससाठी ओळखल्या जातात. तिघांनी मिळून एक नव कपड्यांचे कलेक्शन बाजारात ...

Hot photo of Suzanne, Malaika Arora and Bipasha Basu | सुझैन, मलायका अरोरा आणि बिपाशा बासूचा हॉट फोटो

सुझैन, मलायका अरोरा आणि बिपाशा बासूचा हॉट फोटो

झैन, बिपाशा बासू आणि मलायका अरोरा या नेहमीच त्यांच्या फॅशन्ससेंससाठी ओळखल्या जातात. तिघांनी मिळून एक नव कपड्यांचे कलेक्शन बाजारात आणले आहे. या कलेक्शन लाँचिंगच्यावेळी त्या रॉकिंग अंदाजात दिसतायेत. सुझैनने त्या तिघींचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत तिघेही हॉट अंदाजात दिसत आहे.     

 सुझैन सध्या तिच्या इंटिरिअल डेकोरेशन आणि फॅशनच्या कामात बिझी आहे. ह्रतिक आणि सुझैनचा घटस्फोट झाला आहे. त्यादोघांना दोन मुलेदेखील आहेत. तर मलायका अरोराही पती अरबाजपासून वेगळी झाली आहे. त्या दोघांनीही घटस्फोटासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. मलायकाने तिच्या करिअरवर  लक्षकेंद्रीत केले आहे. तसेच ती मैत्रिणींबरोबर पार्टी करतानाही बऱ्याच वेळा दिसते. बहिण अमृता अरोरा, करिष्मा कपूर आणि करिना कपूर यांच्याबरोबर पार्टीत करताना बऱ्याचवेळा मलायका स्पॉट झाली आहे.  

बिपाशा बासूने नुकताच तिचा लग्नाचा पहिला वाढदिवस सेलिब्रेट करुन गोव्यावरुन परतली आहे. बिपाशा आणि करण सिंग्र ग्रोवरला मंकी कपल म्हणून ओळखले जाते. त्यांच्या रोमांसची चर्चा बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. बिपाशाने ही या तिघींच्या रॅम्पवरील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Web Title: Hot photo of Suzanne, Malaika Arora and Bipasha Basu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.