High End...दिलजीत दोसांज पुन्हा एकदा सुपरहिट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 12:24 IST2018-02-22T06:54:22+5:302018-02-22T12:24:22+5:30
लवकरच दिलजीतचा ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ हा सिनेमा येतोय. पण दिलजीत या चित्रपटामुळे नाही तर त्याच्या एका खास गाण्यामुळे चर्चेत आहे.

High End...दिलजीत दोसांज पुन्हा एकदा सुपरहिट!!
प जाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांज सध्या जाम चर्चेत आहेत. लवकरच दिलजीतचा ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ हा सिनेमा येतोय. पण दिलजीत या चित्रपटामुळे नाही तर त्याच्या एका खास गाण्यामुळे चर्चेत आहे. या गाण्यात दिलजीत अतिशय वेगळ्या लूकमध्ये दिसतोय. त्याच्या या गाण्याचे नाव आहे,High End. इंटरनेटवर धूूम करणारे हे गाणे दिलजीतच्या CON.FI. DEN.TIAL या अल्बममधील आहे. रवि हंजा याने या अल्बमची सगळी गाणी लिहिली आहेत.
High Endगाण्याबद्दल सांगायचे तर दिलजीतने हे गाणे सध्या प्रचंड हिट झाले आहे. या गाण्याच्या व्हिडिओच्या सुरूवातीला दिलजीत एका प्रायव्हेट जेटमधून उतरतो आणि पुढे अख्ख्या गाण्यात अक्षरश: फक्त आणि फक्त दिलजीतचं दिसतो. ३ मिनिटांच्या या गाण्यात दिलजीत रॅपरच्या भूमिकेत दिसतोय. इंटरनेटवर तुफान लोकप्रीय झालेले हे गाणे प्रेक्षकांना आपल्या तालावर थिरकण्यास भाग पाडतेय.
ALSO READ : दिलजीत दोसांजला हॉलिवूडच्या ‘वंडर वूमन’ने दिला नाही भाव! चाहत्यांनी घेतली फिरकी!!
दिलजीतची गाणी तशीही प्रचंड लोकप्रीय आहेत. केवळ पंजाबी श्रोतेचं नाही तर भारतात सर्वदूर त्याचे चाहते आहेत. २०१३ मध्ये आलेले त्याचे ‘प्रोपर पटोला’ हे गाणे असेच प्रचंड हिट झाले होते. याशिवाय ‘पंच तारा’, ‘डू यू नो’, ‘पॅगवाला मुंडा’ ही गाणीही गाजली होती. तूर्तास आपल्या चित्रपटांमध्येही दिलजीत बिझी आहे. अलीकडे त्याच्या ‘सज्जन सिंह रंगरूट’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या चित्रपटात दिलजीत ब्रिटीश इंडियातील एका सैनिकाच्या भूमिकेत आहेत. हा बिग बजेट चित्रपट पंजाबीशिवाय हिंदी व इंग्रजीत रिलीज होणार आहे. येत्या २३ मार्चला हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्याआधी येत्या २३ फेबु्रवारीला दिलजीत व सोनाक्षी सिन्हाचा ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ पे्रक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा एक कॉमेडी ड्रामा आहे. यात सोनाक्षी गुजराती फॅशन डिझाईनरच्या भूमिकेत आहे.