​अरे, सलमानची मुन्नी तर करिश्मा कपूरसारखी दिसू लागली!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 17:49 IST2017-01-12T17:24:01+5:302017-01-12T17:49:42+5:30

सलमान खानची मुन्नी आठवतेय ना? होय, ‘बजरंगी भाईजान’मधली सलमानची मुन्नी अर्थात हर्षाली मल्होत्रा. हर्षाली आता करिश्मा कपूरसारखी दिसू लागलीय. ...

Hey, Salman's Muni looked like Karisma Kapoor !! | ​अरे, सलमानची मुन्नी तर करिश्मा कपूरसारखी दिसू लागली!!

​अरे, सलमानची मुन्नी तर करिश्मा कपूरसारखी दिसू लागली!!

मान खानची मुन्नी आठवतेय ना? होय, ‘बजरंगी भाईजान’मधली सलमानची मुन्नी अर्थात हर्षाली मल्होत्रा. हर्षाली आता करिश्मा कपूरसारखी दिसू लागलीय. आता आम्ही सांगतोय, त्यावर तुमचा विश्वास बसणार नाहीच. पण आमच्याकडे पुरावा आहे. हर्षाली करिश्मासारखी दिसू लागलीय, याच्या पुराव्यादाखल सोशल मीडियावर व्हायरल झालेले काही फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हे फोटो पाहून हर्षाली करिश्मा सारखी दिसू लागलीय, यावर तुमचाही विश्वास बसेल.

हर्षालीने अलीकडे करिश्मा कपूरसोबत फोटोशूट केले. केवळ करिश्मा कपूरच नाही तर ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर, ज्येष्ठ अभिनेत्री जयाप्रदा आणि अभिनेता नील नितीन मुकेश अशा चार जणांसोबत हर्षाली या फोटोशूटमध्ये दिसली. खुद्द हर्षालीने या फोटोशूटचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात हर्षाली आणि करिश्मा या दोघींचा फोटो एकदम हटके आहे. यात दोघीही टॅड्रिशनल लूकमध्ये दिसत आहेत.





‘बजरंगी भाईजान’नंतर हर्षाली एकदम प्रकाशझोतात आली होती. दुसºया वर्गात शिकणारी हर्षाली यापूर्वी ‘लौट आओ तृषा’ या मालिकेत दिसली होती. याशिवाय फेअर एन लवली, पियर्स, हॉर्लिक्स, एचडीएफसी बँक अशा अनेक जाहिरातीतही ती दिसली होती. अलीकडे एका मुलाखतीत हर्षालीने मोठेपणी अभिनेत्री बनण्याची इच्छा बोलून दाखवली होती. तुला मोठे होऊन काय बनायचेय ? असा प्रश्न तिला केला गेला होता. यावर तिने अभिनेत्री असे उत्तर दिले होते. पण कुणासारखे? तर करिना कपूरसारखे. होय, मला करिना कपूरसारखे बनायचे आहे, असे ती म्हणाली होती. कदाचित करिनासारखे बनण्याच्यादिशेने हर्षालीने एक पाऊल पुढे टाकले म्हणायचे. करिनाची बहीण करिश्मा व वडील रणधीर कपूर यांच्यासोबत फोटोशूट म्हटल्यावर शेवटी असेच मानायला हवे. होय ना?

Web Title: Hey, Salman's Muni looked like Karisma Kapoor !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.