​तुम्ही पाहिलेत का जॅकलिनचे दुसरे घर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 16:45 IST2016-11-09T16:45:45+5:302016-11-09T16:45:45+5:30

जॅकलिन फर्नांडिस ही सध्या बिझी आहे. कशात? तर तिच्या नव्या घराच्या सजावटीत. होय, ‘माझे दुसरे घर, तुम्हीही बघा,’ या ...

Have you seen another Jacqueline house? | ​तुम्ही पाहिलेत का जॅकलिनचे दुसरे घर?

​तुम्ही पाहिलेत का जॅकलिनचे दुसरे घर?

कलिन फर्नांडिस ही सध्या बिझी आहे. कशात? तर तिच्या नव्या घराच्या सजावटीत. होय, ‘माझे दुसरे घर, तुम्हीही बघा,’ या कॅप्शनसह बुधवारी जॅकलिनने टिष्ट्वटरवर एक फोटो शेअर केला. हे दुसरे घर म्हणजे जॅकची वॅनिटी व्हॅन. आजघडीला वॅनिटी व्हॅन ही सिने तारकांची आवश्यक गरज बनली आहे.  ‘सर/ मॅडम, शॉट रेडी है ,’असा निरोप आल्यावर आलिशान वॅनिटी व्हॅनमधून उतरून स्टुडिओत जाणारा अभिनेता, अभिनेत्री, असले दृश्य हिंदी चित्रपटसृष्टीच्या सेटवर सहज दिसत असतं. प्रशस्त वॅनिटी व्हॅन अभिनेते आणि अभिनेत्रींना मेकअप आणि कपडे बदलण्यासाठी वापरली जाते. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या वॅनिटी व्हॅनमुळे चर्चेत असतात. या व्हॅनवर अनेक सेलिब्रिटी सढळ हाताने खर्च करतात. मेगास्टार अमिताभ बच्चन ते किंगखान शाहरूख खान यांच्या वॅनिटी व्हॅन ब-याच चर्चेत असतात. आता यात जॅकलिनचेही नाव जुळले आहे. काळ्या रंगाची ही अलिशान वॅनिटी आता माझे दुसरे घर झाले आहे, असे सांगत जॅकने चाहत्यांना या व्हॅनची एक ‘झलक’ दाखवली. आता या घरात जॅकलिन कशी नांदते ते बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सध्या जॅकलिन ‘झलक दिखला जा’ या रिअ‍ॅलिटी डान्स शोची जज म्हणून दिसते आहे. अलीकडे जॅकलिनचा ‘ए फ्लाइंग जट्ट’ हा सिनेमा येऊन गेला. यात ती प्रथमच टायगर श्रॉफसोबत दिसली होती. मात्र हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला.