हृतिक टाळतोय शाहरुखशी पंगा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 11:07 IST2016-09-10T05:37:45+5:302016-09-10T11:07:45+5:30
जीभ पोळल्यावर माणूस ताकदेखील फुंकून पितो. अशीच काहीशी गत सध्या हृतिक रोशनची झाली आहे. मागच्या महिन्यात अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’शी ...

हृतिक टाळतोय शाहरुखशी पंगा?
ज भ पोळल्यावर माणूस ताकदेखील फुंकून पितो. अशीच काहीशी गत सध्या हृतिक रोशनची झाली आहे. मागच्या महिन्यात अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’शी दोन हात करून तोंडघशी पडल्यामुळे तो आता बॉक्स आॅफिसवर कोणाला टक्क देऊ इच्छित नाही.
म्हणून तर शाहरुखच्या ‘रईस’सोबत होणारा क्लॅश टाळण्यासाठी आगामी प्रजासत्ताक दिनाला त्याचा प्रदर्शित होणारा ‘काबील’ चित्रपट पुढे ढकलण्यात आल्याची गुप्त चर्चा आहे. शाहरुखशी पंगा घेणे खूप महागात पडू शकते हे कदाचित त्याने ओळखले असावे.
त्याचे वडील राकेश रोशन आणि ‘रईस’चे निर्माते रितेश सिधवानी व फरहान अख्तर यांच्या गेले चार दिवस रात्री उशीरापर्यंत बैठकांचे सत्र सुरू आहे. दोघांचेही बॉक्स आॅफिस हित साध्य करण्यासाठी कोणत्या तडजोडी करता येऊ शकतात यावर त्यांचे मंथन चालू आहे.
पुढच्या आठवड्यात प्रागहून परत आल्यावर शाहरुखसोबतही ते चर्चा करणार आहेत. सध्या हृतिकला एक जबरदस्त हिट चित्रपटाची गरज आहेआणि त्याचे वडिल त्यासाठी सर्वोतेपरी प्रयत्न करताना दिसताहेत.