बहिण सोनम कपूरला लग्नात 'हे' खास गिफ्ट देणार हर्षवर्धन कपूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 11:22 IST2018-05-03T05:52:59+5:302018-05-03T11:22:59+5:30
बॉलिवूडमध्ये सध्या सगळीकडे चर्चा आहे ती अनिल कपूरची लाडकी मुलगी सोनम कपूरच्या लग्नाची. सोनमच्या लग्नाला घेऊन भाऊ हर्षवर्धन कपूर ...

बहिण सोनम कपूरला लग्नात 'हे' खास गिफ्ट देणार हर्षवर्धन कपूर
ब लिवूडमध्ये सध्या सगळीकडे चर्चा आहे ती अनिल कपूरची लाडकी मुलगी सोनम कपूरच्या लग्नाची. सोनमच्या लग्नाला घेऊन भाऊ हर्षवर्धन कपूर खूपच खूष आहे. सोनमचे लग्न बिझनेसमन आनंद अहुजासोबत होते आहे. याबाबत हर्षवर्धन म्हणाला, ''आनंद एक चांगला माणूस आहे.''
हर्षवर्धनचा आगामी चित्रपट 'भावेश जोशी सुपरहिरो'चा ट्रेलर लाँच नुकताच पार पडला. यावेळी मीडियाशी बोलताना हर्षवर्धनचा सोनम कपूरचा लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला, मी तिच्या लग्नाला घेऊऩ खूप खूश आहे. आनंद एक खूप चांगला व्यक्ती आहे. सध्या मी 'भावेश जोशी सुपरहिरो' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे मला जास्त लक्ष देता येत नाहीय.
हर्षवर्धनला बहिणच्या लग्नाला काय गिफ्ट देणार असा प्रश्नदेखील विचारण्यात आला त्यावर तो म्हणाला, 'एक हग' मला तिला खूप सारे गुडलूक द्यायचे आहे. कारण मी सध्या कंगाल आहे. ज्या चित्रपटात मी सध्या काम त्यातून मला जास्त मानधन मिळत नाही आहे. त्यामुळे मला बहिणीला खूप सारे प्रेम द्यायचे आहे.
ALSO READ : सोनम कपूरचा होणारा पती आनंद आहुजा इतक्या कोटींच्या संपत्तीचा आहे मालक!
सोनम कपूरचे लग्न 8 मे रोजी मुंबईत होणार आहे. या शाही लग्नाची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. हळद, संगीत आणि मेहंदीचा कार्यक्रम 7 मे रोजी मुंबईतील एका फाईव्ह स्टाइल हॉटेलमध्ये पार पडणार आहे. तर वेडिंग सेरेमनी सोनमची आण्टी आणि इंटीरियर डिझायनर कविता सिंग यांच्या बॅण्डस्टॅण्डस्थित आलिशान बंगल्यात पार पडणार आहे. लग्नाचे सर्व विधी घरातच असलेल्या मंदिरात केले जाणार आहेत.
हर्षवर्धनचा 'भावेश जोशी सुपरहिरो' 25 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता हर्षवर्धनला ‘भावेश जोशी’कडून बºयाच अपेक्षा आहेत. आता त्याच्या या अपेक्षा किती पूर्ण होतात, ते लवकरच दिसेलच.