Happy Marriage Anniversary : लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बिपाशा बसूने शेअर केला एक सुंदर व्हिडिओ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2017 18:46 IST2017-04-30T13:07:11+5:302017-04-30T18:46:56+5:30

अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोहर यांच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण होत असून, त्यांनी इन्स्टाग्रामवर एक सुंदर व्हिडिओ शेअर करून आपला आनंद फॅन्सबरोबर शेअर केला आहे.

Happy Marriage Anniversary: ​​A beautiful video shared by Bipasha Basu for the wedding anniversary! | Happy Marriage Anniversary : लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बिपाशा बसूने शेअर केला एक सुंदर व्हिडिओ !

Happy Marriage Anniversary : लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बिपाशा बसूने शेअर केला एक सुंदर व्हिडिओ !

िनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोहर यांच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण होत असून, त्यांनी इन्स्टाग्रामवर एक सुंदर व्हिडिओ शेअर करून आपला आनंद फॅन्सबरोबर शेअर केला आहे. या दाम्पत्याला ‘सीएनएक्स मस्ती’कडून भरपूर शुभेच्छा!



वर्षभरापूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या बिपाशा आणि करण यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त बिपाशाने इन्स्टाग्रामवर गोव्यातील काही हॉट फोटोज् आणि व्हिडिओ शेअर करून त्यांच्या फॅन्सला हा आनंद सेलिब्रेट केला आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर विचार करीत आहात. सध्या हे कपल त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गोव्याला पोहोचले आहेत. 

वृत्तानुसार लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बिपाशा दुबई येथून थेट गोव्याला पोहोचली. मात्र तिच्या अगोदर पती करण गोव्याला पोहोचला होता. त्यामुळे बिपाशासाठी हे खूप मोठे सरप्राइज होते. करणने बिपाशासाठी स्वत: काही कार्ड बनविले, ती विमानतळावर येताच तिला त्याने हा कार्ड दिले.



बिपाशाने हे कार्ड आणि काही फोटोज् शेअर करताना लिहिले की, ‘प्रेमात पुन्हा एकदा रममाण होताना, मस्तीची ही वेळ आहे, मंकी लव्ह!’ करणनेदेखील काही पोस्ट यावेळी शेअर करीत लिहिले की, ‘प्रत्येक गोष्ट तिच्यामुळे सोपी वाटते’ यावेळी या दाम्पत्याने एक व्हिडिओही शेअर केला. ज्यामध्ये बिपाशा अन् करण त्यांच्या लग्नाच्या आठवणींसह एकत्र व्यतित केलेले काही क्षण दाखवित आहेत. 
 

गेल्यावर्षी ३० एप्रिल रोजी या जोडप्याने धूमधडाक्यात विवाह केला होता. मध्यंतरीच्या या काळात या दोघांमध्ये आलबेल नसल्याची चर्चा रंगली होती. मात्र ही निव्वळ अफवा असल्याचे नंतर स्पष्ट झाले. 

Web Title: Happy Marriage Anniversary: ​​A beautiful video shared by Bipasha Basu for the wedding anniversary!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.