Happy Birthday Neil : ‘या’अंतराळवीराच्या नावावरून गानकोकिळेने केले होते नील नितीन मुकेशचे नामकरण!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 06:10 AM2018-01-15T06:10:49+5:302018-01-15T11:40:49+5:30

संगीताचा वारसा लाभलेल्या घरात लहानाचा मोठा झालेला अभिनेता नील नितीन मुकेश याचा आज (१५ जानेवारी) वाढदिवस.  खरे तर नील ...

Happy Birthday Neil: 'Ganakokile' in the name of 'Inner' Nil Nitin Mukesh naming! | Happy Birthday Neil : ‘या’अंतराळवीराच्या नावावरून गानकोकिळेने केले होते नील नितीन मुकेशचे नामकरण!

Happy Birthday Neil : ‘या’अंतराळवीराच्या नावावरून गानकोकिळेने केले होते नील नितीन मुकेशचे नामकरण!

googlenewsNext
ong>संगीताचा वारसा लाभलेल्या घरात लहानाचा मोठा झालेला अभिनेता नील नितीन मुकेश याचा आज (१५ जानेवारी) वाढदिवस.  खरे तर नील नितीन मुकेश यालाही लहानपणापासून गाण्याची आवड आहे. पण गायक बनण्यापेक्षा त्याचा कल लहानपणापासून अभिनयाकडे राहिला. नीलचे वडिल नितीन मुकेश आणि आजोबा मुकेश बॉलिवूडचे दिग्गज गायक राहून चुकले होते. नील यानेही एकेकाळी गायक व्हायचे स्वप्न बघितले होते. पण कदाचित नियतीला काही वेगळेच मंजूर होते. आज जाणून घेऊ या, नीलबद्दल काही खास गोष्टी...



नील नितीन मुकेशचा जन्म १५ जानेवारी १९८२ रोजी मुंबईत झाला. त्याचे वडिल नितीन मुकेश यांना राज कपूर यांचा ‘आवाज’ म्हणून ओळखले जाई. कारण त्यांनी बहुतांश चित्रपटात राज कपूर यांना आवाज दिला.

नीलचे संपूर्ण नाव नील नितीन मुकेशचंद्र माथूर आहे. गानकोकिळा लता मंगेशकर यांनी त्याचे नामकरण केले होते. लता दीदी अंतराळवीर नील आर्मस्ट्रांगमुळे प्रभावित होत्या. त्याच्याच नावावरून लता दीदींनी आत्या या नात्याने नीलला ‘नील’ हे नाव दिले.




१२ वीनंतर नीलला शिकायचे नव्हते. पण पित्याच्या आग्रहाखातर त्याने पदवी पूर्ण केली. यानंतर त्याने नमित कपूर आणि अभिनेते अनुपम खेर यांच्या अ‍ॅक्टिंग अ‍ॅकेडमीत अभिनयाचे धडे घेतले.

नीलने १९८८ मध्ये आलेल्या ‘विजय’ आणि १९८९ मध्ये आलेल्या ‘जैसी करनी वैसी भरनी’मध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते. इंग्रजांसारख्या दिसणा-या नीलने २००७ मध्ये दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या ‘जॉनी गद्दार’मधून बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर २००९ मध्ये ‘आ देखे जा’मध्ये तो बिपाशा बासूसोबत बोल्ड पोज देताना दिसला.
 


२००९ मध्ये दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या ‘जेल’ या चित्रपटात न्यूड सीन दिल्याने नील चांगलाच चर्चेत आला होता. यावरून वादही झाला होता. यानंतर हा सीन एडिट करून हा चित्रपट रिलीज झाला. अर्थात इतके करूनही बॉक्सआॅफिसवर चित्रपट आपटला होता.

आपल्या दशकाच्या करिअरमध्ये नीलने सुमारे २० चित्रपटांत काम केले. यात  ‘प्लेयर्स’, ‘न्यूयॉर्क’, ‘गोलमान अगेन’, ‘वजीर’, ‘इंदू सरकार’,‘ पे्रम रतन धन पायो’ मुख्य आहेत. लवकरच नील अभिनेता प्रभाससोबत ‘साहो’मध्ये दिसणार आहे.



ALSO READ :  पाहा : नील नितीन मुकेश अन् रूक्मिणीचा ‘वेडिंग अल्बम’!!

गतवर्षी नीलने रूक्मिणी सहायसोबत लग्न केले. नीलचे हे अरेंज मॅरेज आहे. रूक्मिणी ही नीलच्या आई-वडिलांची पसंती आहे.

Web Title: Happy Birthday Neil: 'Ganakokile' in the name of 'Inner' Nil Nitin Mukesh naming!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.