‘रईस’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आहे ही भली मोठी चूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 12:57 IST2016-12-11T17:42:06+5:302016-12-12T12:57:10+5:30

You won't believe how many alcohol bottles were crushed by Nawazuddin in the Raees trailer : Raees trailer : ‘रईस’चा ट्रेलर तुम्ही पाहिला असेल तर एक गोष्ट तुम्ही निश्चितपणे पाहिली असेल. ती म्हणजे, मद्याच्या बाटल्यांवर बुल्डोजर फिरवणारा नवाजुद्दीन. या एका सीनसाठी ६० हजार मद्याच्या बाटल्या आणल्या गेल्या.

This is a great mistake in the film 'Rais'! | ‘रईस’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आहे ही भली मोठी चूक!

‘रईस’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आहे ही भली मोठी चूक!

ंगखान शाहरूख खान याच्या ‘रईस’ या चित्रपटाचा ट्रेलर अपेक्षेनुसार, लोकांच्या पसंतीत उतरले आहे. सोशल मीडियावर आत्तापर्यंत दीड कोटींपेक्षा अधिक लोकांनी हा ट्रेलर पाहिजा.  २.४० मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये शाहरूख एकदम हटके लूकमध्ये दिसतो आहे. मद्यव्यवसाय आणि अंडरवर्ल्ड जगतातील गँगस्टरच्या रूपात शाहरूख यात दिसतोय.  नवाजुद्दीन सिद्दीकी हा यात एका पोलिस अधिका-याच्या भूमिकेत आहे.



आता  ‘रईस’चा ट्रेलर तुम्ही पाहिला असेल तर एक गोष्ट तुम्ही निश्चितपणे पाहिली असेल. ती म्हणजे, मद्याच्या बाटल्यांवर बुल्डोजर  फिरवणारा नवाजुद्दीन. आता आम्ही नेमक्या या एका दृश्याबाबत का बोलतोय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खरे तर हीच गंमत आहे. या एका सीनने प्रॉडक्शन टीमच्या नाकीनऊ आले. अगदी रांगेत रचलेल्या मद्याच्या बाटल्यांवर नवाजुद्दीन अगदी ऐटीत बुल्डोजर  चालवत असताना यात दिसतो आहे. पण हा सीन घेणे सोपे नव्हते. कारण यासाठी प्रॉडक्शन टीमला बरेच पापड लाटावे लागलेत. होय, या एका सीनसाठी ६० हजार मद्याच्या बाटल्या आणल्या गेल्या आणि एका वृत्तानुसार, या ६० हजार बाटल्या जमवता जमवता प्रॉडक्शन टीमच्या नाकीनऊ आले. पण हा टास्क प्रॉडक्शन टीमने पूर्ण केला आणि मगच नवाजुद्दीनचा बुल्डोजर  चालला.



खरे तर  दारुच्या बाटल्यांवरुन बुल्डोजर फिरवतानाच्या या सीनमध्ये एक चूकही आहे. पण लक्ष देऊन बघितले तर लक्षात येते की, या सीनमधल्या बाटल्या रॉयल स्टॅग कंपनीच्या   आहेत. ‘रईस’मध्ये १९८० चा काळ दाखवण्यात आला आहे. पण ही कंपनी मात्र १९९५ मध्ये स्थापन करण्यात आलेली. आता इतकी क्षुल्लक चूक खरे तर चालायचीच. कारण शाहरूखच्याच शब्दांत सांगायचे तर ‘बड़े-बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है.’

Web Title: This is a great mistake in the film 'Rais'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.