Exclusive आशाताईंच्या फॅन्ससाठी गुड न्यूज !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 16:17 IST2016-07-19T10:44:37+5:302016-07-19T16:17:08+5:30
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यापुढं स्टेज शो करणार नसल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी झळकलं होतं. अमेरिकेतल्या एका परफॉर्मन्सनंतर आशाताईंनी हे ...

Exclusive आशाताईंच्या फॅन्ससाठी गुड न्यूज !
ज येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यापुढं स्टेज शो करणार नसल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी झळकलं होतं. अमेरिकेतल्या एका परफॉर्मन्सनंतर आशाताईंनी हे जाहीर केल्याचं बोललं जात होतं.मात्र आशाताईंच्या सर्व फॅन्ससाठी एक गुड न्यूज आहे. कारण आशाताईंच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचं खुद्द मंगेशकर घराण्यातून सांगितलं गेलंय. मंगेशकर घराण्यातील तिस-या पिढीचं प्रतिनिधीत्व करणा-या गायिका राधा मंगेशकर यांनी याबाबत भूमिका मांडलीय.अमेरिकेत परफॉर्म करताना त्या भावुक झाल्या असतील. त्याच भावनेच्या आवेशात यापुढं असं परफॉर्म करायला जमेन की नाही असं बोलता बोलता बोलल्या असतील असं राधा मंगेशकरनं म्हटलंय. मात्र आशाताईंच्या बोलण्यातून उलटा अर्थ काढून त्या स्टेज शो करणार नाही अशी बातमी बनवण्यात आली असावी असं राधा मंगेशकर यांनी सांगितलंय. आशाताईंचं जे वय आहे त्या वयात आपण काहीही करु शकणार नाही असंही राधा मंगेशकर यांनी नमूद केलंय. या वयातही आशाताई ब-याच एक्टिव्ह असून त्यांची एनर्जी तरुणांनाही लाजवेल अशीच असल्याचंही राधानं आवर्जून सांगितलं.