​टायगर श्रॉफच्या चाहत्यांसाठी आली एक खूशखबर! वाचा संपूर्ण बातमी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 10:36 IST2018-04-03T05:01:16+5:302018-04-03T10:36:06+5:30

काही दिवसांपूर्वी आलेल्या एका बातमीने टायगर श्रॉफच्या चाहत्यांची प्रचंड निराशा केली होती. ही बातमी होती, टायगरचा आगामी अ‍ॅक्शनपट ‘रॅम्बो’ ...

A good news came to fans of Tiger Shroff! Read the whole news !! | ​टायगर श्रॉफच्या चाहत्यांसाठी आली एक खूशखबर! वाचा संपूर्ण बातमी!!

​टायगर श्रॉफच्या चाहत्यांसाठी आली एक खूशखबर! वाचा संपूर्ण बातमी!!

ही दिवसांपूर्वी आलेल्या एका बातमीने टायगर श्रॉफच्या चाहत्यांची प्रचंड निराशा केली होती. ही बातमी होती, टायगरचा आगामी अ‍ॅक्शनपट ‘रॅम्बो’ थंडबस्त्यात गेल्याची. पण आता आमच्याकडे टायगरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, निर्मात्यांनी ‘रॅम्बो’ला हिरवी झेंडी दिली आहे. म्हणजेच, येत्या दिवसांत टायगरचा जबरदस्त ‘रॅम्बो’ अवतार चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.



दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी ही माहिती दिली. ‘रॅम्बो’चा हिंदी रिमेक जरूर बनणार. पण याचे शूटींग सुरू व्हायला थोडा वेळ लागेल. कारण ‘रॅम्बो’च्या रिमेकवर काम सुरु करण्यापूर्वी बरीच तयारी करावी लागणार आहे. या तयारीसाठी काही दिवस लागतील, असे सिद्धार्थ यांनी सांगितले. मी आणि टायगर या प्रोजेक्टवर काम करत असताना यशराज फिल्म्सने एका दुसºया अ‍ॅक्शन चित्रपटाची तयारी सुरू केली. त्या अ‍ॅक्शन चित्रपटासाठी माझ्या डोक्यात सर्वप्रथम हृतिक रोशनचे नाव आले होते. पण सरतेशेवटी आम्ही टायगरचे नाव फायनल केले. यशराजचा हा चित्रपट आपण करणार असू तर आपल्याला ‘रॅम्बो’ लांबणीवर टाकावा लागेल, हे मी त्याचवेळी  टायगरला सांगितले होते. टायगर राजी झाला. त्यामुळे आधी आम्ही यशराजचा चित्रपट करणार असून नंतर ‘रॅम्बो’वर काम सुरु करू. ‘रॅम्बो’ची घोषणा होण्यापूर्वी हा एक फ्रेंचाइजी चित्रपट असणार, हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे ‘रॅम्बो’चा पहिला भाग सुपरहिट होणे गरजेचे आहे. ‘रॅम्बो’ सुपरहिट झाला तरचं पुढचे भाग बनतील. त्यामुळे ‘रॅम्बो’साठी आम्ही पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार आहोत. पुढीलवर्षी याचे शूटींग होणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले.
टायगर श्रॉफचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘बागी2’ सुपरडुपर हिट ठरलायं. गेल्या चार दिवसांत या चित्रपटाने ७५ कोटींचा बिझनेस केला आहे.

ALSO READ : ​​‘बागी2’ने तोडला ‘पद्मावत’चा विक्रम! टायगर श्रॉफची अ‍ॅक्शन बघून अक्षय कुमार, हृतिक रोशन थक्क!!

Web Title: A good news came to fans of Tiger Shroff! Read the whole news !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.