देव आनंदच्या आयुष्यात आलेल्या महिला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2017 01:41 PM2017-01-28T13:41:36+5:302017-01-28T19:11:36+5:30

चॉकलेट हिरो देव आनंद यांना आयुष्यभर चिरतरूण राहण्याचा आनंद घेता आला, असे म्हटले तर वावगे ठरू नये. देव आनंद ...

God has come in the life of Dev Anand | देव आनंदच्या आयुष्यात आलेल्या महिला

देव आनंदच्या आयुष्यात आलेल्या महिला

googlenewsNext
कलेट हिरो देव आनंद यांना आयुष्यभर चिरतरूण राहण्याचा आनंद घेता आला, असे म्हटले तर वावगे ठरू नये. देव आनंद यांच्या आयुष्यात अनेक महिला आल्या. त्यातील सुरैय्या यांच्यासोबतचे प्रेमप्रकरण गाजले. १९४८ साली गाजलेले हे प्रेमप्रकरण आजही त्यांचे चाहते आठवतात. शेवटच्या क्षणापर्यंत देव आनंद यांना तरुणींच्या गळ्यातील ताईत म्हणूनच पाहता येईल.
आपल्या महाविद्यालयीन काळात इतिहासाच्या प्राध्यापकाच्या मुलीशी त्यांचे एकतर्फी प्रेमप्रकरण होते. त्यांना ती मुलगी खूप आवडायची. परंतु तिला सांगण्याचे धाडस देव आनंद यांच्यात नव्हते. त्यामुळे त्यांचे हे पहिले प्रेम गुलदस्त्यात राहिले. ‘रोमान्सिंग विथ लाईफ’ या त्यांच्या आत्मचरित्रात देव आनंद यांनी आपल्या प्रेम प्रकरणांबाबत सविस्तर लिहिले आहे.



वयाच्या २५ व्या वर्षी म्हणजे १९४८ साली देव आनंद यांनी सुरैय्या यांच्यासमवेत ‘विद्या’ या चित्रपटात काम केले. देव आनंद यांच्या अनुसार सुरैय्या यांची भेट ‘जीत’ चित्रपटाच्या सेटवर झाली. यावेळी त्यांच्या मनात आकर्षण झाले. तो काळ सुरैय्या यांचा होता. आकर्षणाचे रुपांतर प्रेमात झाले. देव आनंद त्यावेळी मुंबईच्या चर्चगेटहून चालत मरीन ड्राईव्ह येथील सुरैय्या यांच्या घरापर्यंत जायचे. त्यावेळी सुरैय्या यांना पाहण्यासाठी खूप गर्दी व्हायची. सुरैय्या यांच्या आईला या दोघांचे प्रेम पसंत होते, मात्र सुरैय्या यांच्या आजीला हे आवडले नाही. 
त्या काळात इतरत्र फिरता येत नसायचे. केवळ सेटवरच एकमेकांशी बोलणे व्हायचे. देव आनंद आणि सुरैय्या यांनी लग्न करावयाचे ठरविले, मात्र सुरैय्या यांच्या आजीने याला विरोध केला. आजीच्या निर्णयाविरुद्ध जाण्यास सुरैय्यानी नकार दिला होता. त्यावेळी अनेक जण हिंदू-मुस्लीम असा वाद निर्माण करायचे.  या दोघांच्या प्रेमाबाबतही माध्यमांनी जोरदार अफवा उठविल्या. एके दिवशी सुरैय्या यांनी देव आनंद यांना नकार कळविला. त्यानंतर देव आनंद खूप रडले. 



देव आनंद यांनी नंतर कल्पना कार्तिक यांच्यासमवेत लग्न केले. या दोघांनी आंधियाँ, टॅक्सी ड्रायव्हर, हाऊस नं. ४४ हे चित्रपट केले. टॅक्सी ड्रायव्हरच्या सेटवर त्यांनी लग्न केले. काही दिवसानंतर कल्पना कार्तिक चित्रपटांमधून गायब झाली. देव आनंद यांनी आपले सारे ध्याय चित्रपट निर्मितीकडे वळविले. कल्पना यांच्यापासून त्यांना दोन मुले झाली. सुनील आणि देविना.



१९७० साली देव आनंद यांनी हरे रामा हरे कृष्णा हा चित्रपट काढला. यामध्ये झीनत अमानला त्यांनी संधी दिली. देव आनंद यांनी झीनतला सिगारेट दिली. सिगारेट पिताना झीनतने ज्या पद्धतीने देव आनंद यांच्याकडे पाहिले, त्यावेळी देव तिच्यावर फिदा झाले. एका पार्टीत राज कपूरसोबत झीनतला पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसला. त्यावेळी ही आपली झीनत राहिली नाही, म्हणून परतले.
आयर्लंडमधील एका मुलीसोबत देव आनंद यांचे प्रेमप्रकरण होते. हे त्यांची पत्नी कल्पना यांना पसंत नव्हते. या मुलीवरुन देव आणि कल्पना यांचे बºयाचवेळा खटकेही उडाले.



हेमा मालिनी, टीना मुनीम, तब्बू यांना पहिल्यांदा ब्रेक देण्याचे श्रेय देव आनंद यांनाच जाते.










Web Title: God has come in the life of Dev Anand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.