गिरीजा ओक दिसणार एका वेगळ्या माध्यमात,‘क्वॉर्टर’ या शॉर्टफिल्ममध्ये साकारणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 14:26 IST2018-02-27T08:56:09+5:302018-02-27T14:26:09+5:30

कलाकारांना कायमच नवनवीन आव्हानं स्वीकारायला आवडतात. त्यामुळेच मालिका असो किंवा सिनेमा, या माध्यमांमध्ये विविधरंगी भूमिका साकारण्याची या कलाकारांची इच्छा ...

Girija Oak will be seen in a different medium, the role of acting in the short film 'Quarter' | गिरीजा ओक दिसणार एका वेगळ्या माध्यमात,‘क्वॉर्टर’ या शॉर्टफिल्ममध्ये साकारणार भूमिका

गिरीजा ओक दिसणार एका वेगळ्या माध्यमात,‘क्वॉर्टर’ या शॉर्टफिल्ममध्ये साकारणार भूमिका

ाकारांना कायमच नवनवीन आव्हानं स्वीकारायला आवडतात. त्यामुळेच मालिका असो किंवा सिनेमा, या माध्यमांमध्ये विविधरंगी भूमिका साकारण्याची या कलाकारांची इच्छा असते. सोशल मीडियाच्या युगात तर कलाकारांपुढची आव्हानं आणखी वाढली आहेत. त्यामुळेच कोणत्याही माध्यमात भूमिका साकारत आव्हान पेलण्याची कलाकारांची तयारी असते. असंच आव्हान पेलण्यासाठी मराठी अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले सज्ज आहे.

छोट्या पडद्यावरील मालिका,सिनेमा आणि मराठी रंगभूमी गाजवणारी मराठमोठी अभिनेत्री म्हणजे गिरीजा ओक-गोडबोले. गिरीजा लवकरच एका वेगळ्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. जाहिराती, मालिका, सिनेमा, नाटक यानंतर गिरीजा आता शार्टफिल्मच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. ‘क्वॉर्टर’ या शॉर्टफिल्ममध्ये ती झळकणार आहे.नवज्योत बांदिवडेकर याने ही शॉर्टफिल्म दिग्दर्शित केली आहे. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत ही शॉर्टफिल्म रसिकांच्या भेटीला येणार आहे.शीर्षकावरुन या शॉर्टफिल्मचा विषय कळत नसला तरी यांत गिरीजाचा वेगळा लूक रसिकांना पाहायला मिळणार आहे. कमी वेळात खूप सांगण्याची आणि आशय प्रभावीपणे मांडण्याची ताकद शॉर्टफिल्ममध्ये असते. ही संधी क्वार्टरच्या निमित्ताने मिळाल्याने गिरीजा उत्साही आहे.आजवर विविध माध्यमांतून वेगवगेळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्यास मिळाल्या असल्या तरी ‘क्वॉर्टर’मधली भूमिका अभिनेत्री म्हणून समाधान देणारी असल्याचेही गिरीजाला वाटते. या शॉर्टफिल्ममध्ये गिरीजासारख्या अभिनेत्रीने भूमिका साकारणे हेच मुख्य वेगळेपण असल्याचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर याने म्हटले आहे.‘नेविअन्स स्टुडिओ प्रा. लि.’ या निर्मिती संस्थेअंतर्गत नम्रता बांदिवडेकर यांनी या शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे. आलाप भागवत यांनी कथा आणि संवादलेखनाचे काम केले आहे. 


Web Title: Girija Oak will be seen in a different medium, the role of acting in the short film 'Quarter'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.