​गौहर खान अन् बानी जे यांच्या मैत्रीत फूट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 11:11 IST2017-08-17T05:41:44+5:302017-08-17T11:11:44+5:30

बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान आणि व्हीजे गुरबानी जज उर्फ बानी जे या दोघींची मैत्री सगळीकडेच फेमस होती. अनेकांना दोघींच्या ...

Gauhar Khan and Bani Jai fate! | ​गौहर खान अन् बानी जे यांच्या मैत्रीत फूट!

​गौहर खान अन् बानी जे यांच्या मैत्रीत फूट!

लिवूड अभिनेत्री गौहर खान आणि व्हीजे गुरबानी जज उर्फ बानी जे या दोघींची मैत्री सगळीकडेच फेमस होती. अनेकांना दोघींच्या मैत्रीचा हेवा वाटायचा. ‘बिग बॉस’चे घर तर या दोघींच्या मैत्रीचे साक्षीदार. ‘बिग बॉस’चे निर्माते बानीला ‘बिग बॉस’च्या घरात आणण्यासाठी बरेच प्रयत्न करत होते. पण बानी यायला तयार नव्हती. केवळ आणि केवळ गौहरच्या म्हणण्यावरून बानीने या शोमध्ये भाग घेतला होता. ‘बिग बॉस’च्या घरात पुरती एकटी पडलेल्या बानीला गौहर भेटायला आली होती, तेव्हाचा क्षण कदाचित तुम्हाला आठवत असावा. गौहर भेटायला आल्याबरोबर बानीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. जणू एखादा ‘अल्लादीनचा चिराग’ मिळावा,इतका आनंद बानीला झाला होता. पण आता बानी व गौहर यांचे नाते आधीसारखे राहिलेले नाही. विश्वास ठेवणे कठीण आहे, पण या मैत्रीत फूट पडलीय. बानी व गौहर दोघींच्याही चाहत्यांसाठी ही बातमी कुठल्या धक्क्यापेक्षा कमी नाही.



कधी काळी एकमेकींच्या अतिशय क्लोज असलेल्या या दोघी मैत्रिणी आता कदाचित एकमेकांचे तोंड पाहणेही पसंत करत नाही. म्हणूनच की काय, बानीने  इन्स्टाग्रामवरील गौहरसोबतचे सर्व फोटो डिलीट केले आहेत.  इतकेच नाही तर  गौहरला इन्स्टाग्रामवर अनफॉलोही केले आहे. गौहरनेही बानीला अनफॉलो करत वचपा काढला आहे. अर्थात कठीण प्रसंगात एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाºया या दोन मैत्रिणींमध्ये असे काय झाले, हे मात्र कळायला मार्ग नाही. तूर्तास तरी याबद्दल कुठलाही अंदाज लावणे कठीण आहे. काही तरी गंभीर घडले असेल, इतके मात्र नक्की. त्याशिवाय ही दोस्ती तुटायची नाय! तुम्हाला या मैत्री तुटण्यामागे काय कारणे असावीत, असे वाटते? आम्हाला जरूर कळवा.

Web Title: Gauhar Khan and Bani Jai fate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.