मान्यतावरील प्रेमासाठी संजय दत्तने एका रात्रीत बाजारातून गायब केल्या पत्नीच्या 'त्या' सिनेमाच्या सीडी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 12:10 PM2023-07-22T12:10:22+5:302023-07-22T12:10:51+5:30

Sanjay Dutt And Manyata Dutt : संजय दत्तने मान्यता दत्तच्या त्या सिनेमाच्या सीडी बाजारातून गायब करण्यासाठी इतकी रक्कम मोजली होती.

For the love of Manyata, Sanjay Dutt disappeared from the market in one night the CDs of his wife's movie 'Thata'!! | मान्यतावरील प्रेमासाठी संजय दत्तने एका रात्रीत बाजारातून गायब केल्या पत्नीच्या 'त्या' सिनेमाच्या सीडी!!

मान्यतावरील प्रेमासाठी संजय दत्तने एका रात्रीत बाजारातून गायब केल्या पत्नीच्या 'त्या' सिनेमाच्या सीडी!!

googlenewsNext

अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आणि मान्यता दत्त(Manyata Dutt)ची प्रेमकहाणी कोणत्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. दोघांच्या लग्नाला १५ वर्षे झाली आहेत. मुस्लिम कुटुंबात वाढलेल्या मान्यताला मोठी अभिनेत्री व्हायचं होतं पण मोठ्या भूमिका न मिळाल्याने तिने बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. मान्यताने अशा चित्रपटात काम करावे हे संजय दत्तला आवडले नाही. त्‍यामुळे त्‍याने त्‍याच्‍या बी ग्रेडच्‍या चित्रपटांच्या सर्व सीडी विकत घेतल्या होत्या. जेव्हा संजय दत्त, मान्यताच्या प्रेमात पडला, तेव्हा तिच्यासाठी बी ग्रेड सीडी आणि डीव्हीडी बाजारातून गायब करुन टाकल्या होत्या.

मान्यता आणि संजय दत्त यांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. मान्यता जेव्हा संजयला भेटली तेव्हा ती बी ग्रेड चित्रपटात काम करायची. पण जेव्हा तिने संजय दत्तला डेट करायला सुरुवात केली तेव्हा तिने असे चित्रपट सोडण्याचा विचार केला होता. याआधी मान्यताने लव्हर्स लाइक या चित्रपटात काम केले होते. जे संजयलाही आवडले नाही. संजय दत्तला मान्यताच्या या चित्रपटाची माहिती होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने या चित्रपटाचे राइट्स २० लाखांना विकत घेतले होते. एवढेच नाही तर या चित्रपटाची सीडी आणि डीव्हीडी बाजारातून हटवण्याचे पूर्ण प्रयत्न केले होते. त्यावेळी संजय दत्तचे मान्यतावर खूप प्रेम होते.

संजय मान्यताने २००८ साली केलं लग्न
अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर संजय दत्त आणि मान्यता यांनी २००८ मध्ये लग्न केले. दोघांचे लग्न अगदी साधेपणाने झाले. दोघांना दोन मुलेही आहेत. दोन्ही मुलांसोबत अभिनेता आनंदी जीवन जगत आहे. संजय आणि मान्यताही आपल्या मुलांसोबत फोटो शेअर करत असतात.

Web Title: For the love of Manyata, Sanjay Dutt disappeared from the market in one night the CDs of his wife's movie 'Thata'!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.