राज कुंद्राच्या अटकेनंतर मुलगा वियानने शेअर केली पहिली पोस्ट, होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 06:47 PM2021-08-03T18:47:14+5:302021-08-03T18:47:38+5:30

आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचा मुलगा वियानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

The first post shared by son Viaan after Raj Kundra's arrest, was discussed | राज कुंद्राच्या अटकेनंतर मुलगा वियानने शेअर केली पहिली पोस्ट, होतेय चर्चा

राज कुंद्राच्या अटकेनंतर मुलगा वियानने शेअर केली पहिली पोस्ट, होतेय चर्चा

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला पोर्नोग्राफी आशय प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. यातच राज कुंद्राच्या अटकेनंतर जवळपास १४ दिवसांनी शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपले मौन सोडले. शिल्पाने या पोस्टमध्ये तिने तिच्या कुटुंबाच्या गोपनियतेचा आदर राखण्याची विनंती केली आहे. त्यानंतर आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचा मुलगा वियानने पोस्ट शेअर केली आहे.

वियानने सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर आई म्हणजेच शिल्पासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. आईला मिठी मारत आई सोबत निवांत क्षण घालवतानाचे काही फोटो त्याने शेअर केले आहेत. या फोटोंना वियानने कोणतही कॅप्शन दिले नाही.


इतकेच नाही तर वियानने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आई शिल्पा शेट्टीने प्रसिद्ध केलेले स्टेटमेंट शेअर केले आहे.
शिल्पा शेट्टीने राज कुंद्राच्या अटकेनंतर सोशल मीडियावर स्टेटमेंट शेअर केले. त्यात तिने म्हटले की, गेले काही दिवस आमच्यासाठी आव्हानात्मक होते. अनेक अफवा आणि आरोप केले जात आहेत. माध्यमांनी आणि काही लोकांनी माझ्याविषयी अनेक अनावश्यक गोष्टी सांगितल्या आहेत. माझ्या कुटुंबाला ट्रोल करण्यात आले, प्रश्न विचारले गेले. मी कोणतीही गोष्ट अजून बोलले नाही आणि या प्रकरणात मी हे करणे टाळणार आहे. कारण हे सर्व न्यायालयीन आहे, म्हणून माझे नाव घेऊन कोणतीही चुकीची विधाने पसरवू नका.


शिल्पा शेट्टीच्या या पोस्टनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे. वरुण धवन, मिजान झाफरी, दिया मिर्झा अशा बरेच कलाकारांनी तिच्या पोस्टला लाइक देत पाठिंबा दर्शवला.

Web Title: The first post shared by son Viaan after Raj Kundra's arrest, was discussed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.