पहला नशा या गाण्यात गायक शानदेखील होता आणि या गाण्यासाठी त्याला मिळाले होते इतके पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 15:15 IST2018-02-24T09:45:43+5:302018-02-24T15:15:43+5:30
जो जिंदा वही सिंकदर हा चित्रपट आजही प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. आमिर खान आणि आयशा जुल्का यांच्या या चित्रपटात मुख्य ...
.jpg)
पहला नशा या गाण्यात गायक शानदेखील होता आणि या गाण्यासाठी त्याला मिळाले होते इतके पैसे
ज जिंदा वही सिंकदर हा चित्रपट आजही प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. आमिर खान आणि आयशा जुल्का यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. आमिरच्या कारकिर्दीतील तो एक महत्त्वाचा चित्रपट मानला जातो. या चित्रटातील पहला नशा हे गाणे तर प्रचंड गाजले होते. उदित नारायण आणि साधना सरगम यांनी ते गायले होते. या गाण्याच्या कोरसमध्ये एक आजचा आघाडीचा गायक होता. एवढेच नव्हे तर हा गायक काही सेकंदासाठी या गाण्यात देखील होता.
शानने आज बॉलिवूडमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्याने एकाहून एक हिट गाणी दिली आहेत. त्याच्या आवाजाची सगळेच तारीफ करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, जो जिंदा वही सिंकदर या चित्रपटातील पहला नशा या गाण्यासोबत शानच्या खास आठवणी आहेत. शानने द व्हॉइस इंडिया किड्स २ या कार्यक्रमाच्या मंचावर या आठवणी नुकत्याच शेअर केल्या. शानने या सिनेमातल्या गाण्यांमध्ये कोरस गायन करण्याबरोबरच अभिनय देखील केला होता आणि या गाण्यासाठी त्याला चार दिवस चित्रीकरण करावे लागले होते. या चार दिवसांच्या चित्रीकरणासाठी त्याला त्यावेळी ६०० रुपये इतके मानधन मिळाले होते.
जब से तेर नैना, चांद सिफारिश, दस बहाने, निकम्मा, सुनो ना, बेहती हवा सा वो यांसारखी शानची अनेक गाणी गाजली असून त्याला आजवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. तन्हा दिल हा त्याचा अल्बम देखील चांगलाच गाजला होता. शानचे कुटुंबिय बॉलिवूडमधील असले तरी शानने त्याच्या करियरच्या सुरुवातीला खूपच स्ट्रगल केला आहे. त्याचे आजोबा जहार मुखर्जी हे गीतकार होते तर त्याचे वडील मानस मुखर्जी प्रसिद्ध संगीतकार होते. पण शान केवळ १३ वर्षांचा असताना त्यांचे निधन झाले, त्यामुळे शानच्या आईने त्यांच्या घराचा सांभाळ केला. शानच्या आईचा देखील आवाज खूप चांगला होता. त्यांनी गायनाच्या माध्यमातूनच घर चालवले. गायिक सागरिका ही शानची बहीण आहे.
Also Read : गायक पापोन किस प्रकरणी बॉलिवूडमध्ये संताप; रविना टंडनने म्हटले, ‘त्वरित अटक करा’!