Finally ​शोध संपला! सनी देओलच्या लाडक्या करणला मिळाली हिरोईन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2017 14:01 IST2017-03-08T08:31:04+5:302017-03-08T14:01:04+5:30

अभिनेता सनी देओल गेल्या अनेक दिवसांपासून एका हिरोईनच्या शोधात होता. होय, एक सुंदर, प्रतिभावान हिरोईन त्याला हवी होती. स्वत:साठी ...

Finally the search is over! Sunny Deol wins heroin !! | Finally ​शोध संपला! सनी देओलच्या लाडक्या करणला मिळाली हिरोईन!!

Finally ​शोध संपला! सनी देओलच्या लाडक्या करणला मिळाली हिरोईन!!

िनेता सनी देओल गेल्या अनेक दिवसांपासून एका हिरोईनच्या शोधात होता. होय, एक सुंदर, प्रतिभावान हिरोईन त्याला हवी होती. स्वत:साठी नाही तर मुलगा करण देओल याच्यासाठी. होय, करण हा ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतो आहे. या चित्रपटासाठी करणच्या अपोझिट हिरोईन सनीला हवी होती. हे सांगायचे कारण म्हणजे, सनीचा शोध आता संपलाय. होय, सनीला करणसाठी अगदी जशी हवी होती, तशी हिरोईन मिळाली आहे. सहर बंबा असे तिचे नाव आहे.सहर शिमल्याची आहे. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.



सनी देओल दिग्दर्शन करणार असलेल्या करणच्या या पहिल्यावहिल्या चित्रपटाचे शीर्षक ठरल्यानंतरच गतवर्षी सनीने त्याचा टिझर सोशल मिडीयावर शेअर केला होता.  यात करणची झलक दाखविली गेली होती.  याचदरम्यान करणसाठी हिरॉईनचा शोध सुरू असल्याचेही सनीने सांगितले होते. त्यासाठी खास हिरोईन हंटची पोस्टर्सही जारी केली गेली होती. दिल्लीत हिरोईनचा शोध चालला होता. यामागचे कारणही स्पष्ट करण्यात आले होते. चित्रपटात हिरोईन दिल्लीची असते, असे दाखवण्यात येणार आहे.म्हणून सर्वप्रथम दिल्लीत हिरोईनचा शोध घेण्याचे ठरले होते. पण शेवटी दिल्लीत सुरू झालेला हा शोध शिमल्यापर्यंत जावून थांबला. यात सहरने बाजी मारली आहे. मीडियानुसार सहर बंबा हिला ‘पल पल दिल के पास’मधील लिडींग रोलसाठी फायनल केले गेले आहे. सहर टाईम्स फ्रेश फेस २०१६ ची विजेती आहे व सध्या मुंबईत शिक्षण घेते आहे.एप्रिलपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू होत आहे.

Web Title: Finally the search is over! Sunny Deol wins heroin !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.