​अखेर आदित्य पांचोली बोललाच!! म्हणे, कंगना राणौत झाली वेडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 10:18 IST2017-09-05T04:48:02+5:302017-09-05T10:18:02+5:30

कंगना राणौत हिने पुन्हा एकदा जुने मुडदे उखरले आहेत. या महिन्यात कंगनाचा ‘सिमरन’ हा सिनेमा रिलीज होणार आहे. पण ...

Finally Aditya Pancholi speaks !! Kangna was crazy! | ​अखेर आदित्य पांचोली बोललाच!! म्हणे, कंगना राणौत झाली वेडी!

​अखेर आदित्य पांचोली बोललाच!! म्हणे, कंगना राणौत झाली वेडी!

गना राणौत हिने पुन्हा एकदा जुने मुडदे उखरले आहेत. या महिन्यात कंगनाचा ‘सिमरन’ हा सिनेमा रिलीज होणार आहे. पण कदाचित कंगनाला आपल्या प्रोफेशनल लाईफपेक्षा, आपल्या आगामी चित्रपटांपेक्षा पर्सनल गोष्टी चघळण्यात अधिक रस आहे. अलीकडे ‘आप की अदालत’ या शोमध्ये कंगनाने तेच केले. सगळ्या पर्सनल नात्यांबद्दल ती बोलली. ती सुद्धा बेधडक़ यात एक नाव होते आदित्य पांचोलीचे. 



इंडस्ट्रीत नवी असताना कंगना व आदित्य दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. पण कालांतराने हे नाते तुटले. तुटले म्हणजे, कंगनानेच तोडले. आदित्य मला प्रचंड मारझोड करायचा,हा स्वत: कंगनाचाच दावा आहे. कंगनाने हा सगळा भूतकाळ ‘आप की अदालत’मध्ये जिवंत केला. आदित्य मला मारायचा. त्याने माझा प्रचंड शारिरीक व मानसिक छळ केला. मी त्याच्या पत्नीला, कॉमन मित्रांना मदत मागितली. पण मला कुणीच मदत केली नाही. अखेर मी पोलिसांत गेले, असे तिने सांगितले.

ALSO READ : केवळ हृतिक रोशनचं नाही तर या अनेकांशी झालेयं कंगना राणौतचे भांडण!

आता या सगळ्या आरोपांवर आदित्य काय बोलतो याची प्रतीक्षा होतीच. तर आदित्यने हे सगळे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर कंगना पागल आहे. तिचे काय होऊ शकते? तुम्ही तिचा इंटरव्ह्यू पाहिला का? एक वेडी व्यक्तीच असे बोलू शकते. मी इंडस्ट्रीत अनेक वर्षांपासून आहे. पण अद्याप कुणीही माझ्याबद्दल असे काही बोललेले नाही. तुम्ही चिखलात दगड फेकाल तर चिखल तुमच्यावरही उडणारच, असे आदित्य म्हणाला. तिच्या या आरोपांमुळे माझे कुटुंब दुखावले आहे. मी व माझी पत्नी आम्ही तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही आदित्य म्हणाला. विशेष म्हणजे, कंगनाला पागल म्हणणाºया आदित्यने कंगनाची तारिफही केली. कंगना एक चांगली अभिनेत्री आहे. पण असे बोलून तिला काय सिद्ध करायचेयं, तिलाच ठाऊक़, असे आदित्य म्हणाला.

Web Title: Finally Aditya Pancholi speaks !! Kangna was crazy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.