ऋचा चढ्ढाला मिळत असलेल्या धमक्यांवरून संतापला फरहान अख्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 18:04 IST2018-05-12T12:18:01+5:302018-05-12T18:04:40+5:30

अभिनेत्री ऋचा चढ्ढा बॉलिवूडमधील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जी प्रत्येक मुद्द्यावर अतिशय बिनधास्तपणे आपली भूमिका मांडत असते. तिच्या या ...

Farhana Akhtar is angry with the threats to getting rid of the debt! | ऋचा चढ्ढाला मिळत असलेल्या धमक्यांवरून संतापला फरहान अख्तर!

ऋचा चढ्ढाला मिळत असलेल्या धमक्यांवरून संतापला फरहान अख्तर!

िनेत्री ऋचा चढ्ढा बॉलिवूडमधील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जी प्रत्येक मुद्द्यावर अतिशय बिनधास्तपणे आपली भूमिका मांडत असते. तिच्या या स्वभावामुळे तिला जिवे मारण्याची धमकीही मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटरवर तिला जिवे मारण्याची आणि बलात्कार करण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. आता दिग्दर्शक तथा अभिनेता फरहान अख्तर याने याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. 

फरहानने गुरुवारी रात्री उशिरा एक ट्विट करीत लिहिले की, ‘ट्विटरच्या मुख्य प्रबंधकांनी याबाबतचा निर्णय घ्यायला हवा की, ते देत असलेल्या सेवेला भविष्यात कुठल्या गोष्टीसाठी स्मरणात ठेवणे त्यांना पसंत आहे. जर चांगल्यासाठी असेल तर त्यांनी ट्विटर या माध्यमाला आणखी चांगले करण्याची गरज आहे. बलात्कार किंवा जिवे मारण्याची धमकी देण्याची कोणालाही परवानगी नाही. असे केल्यास त्याला शिक्षेशिवाय सोडले जाऊ नये.’ 
 }}}} ">Top management at Twitter must regroup and decide what they’d like their service to be remembered for.
If it’s for good, then they need to get smarter in its regulation. Rape and death threats cannot be allowed or go unpunished. @twitter@TwitterIndia— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) May 10, 2018
दरम्यान, ‘ऋचा चढ्ढाच्या समर्थनार्थ सर्वात अगोदर अभिनेत्री पूजा भट्ट हिने आपली भूमिका मांडली होती. तिने ट्विट करून लिहिले होते की, ‘तुला याची तक्रार करायला हवी. ट्विटरनेदेखील याबाबतची जबाबदारी स्वीकारायला हवी. कारण जे लोक जिवे मारण्याची आणि एका महिलेवर बलात्कार करण्याची धमकी देतात अशा लोकांना ट्विटर खुले व्यासपीठ कसे देऊ शकते? केवळ पूजाच  नव्हे तर स्वरा भास्कर, पुलकित सम्राट यांनीदेखील ऋचाचे समर्थन केले होते. 

दरम्यान, ऋचाला मिळत असलेल्या धमक्यांनंतर तिने धमकीच्या ट्विटचे स्क्रिन शॉट काढून त्याबाबतची ट्विटरकडे तक्रार केली होती. काही स्क्रिनशॉट शेअर करताना ऋचाने ट्विट केले होते की, ‘हे ट्विट, मला टार्गेट केले जात असल्याने किंवा माझ्याबद्दल केल्या जात असलेल्या अपशब्दाबद्दल माझी काहीच तक्रार नाही. देशात इतकी बेरोजगारी आहे की, दहा रुपयांसाठीदेखील कोणीही ट्विट करण्याचे धाडस करते. त्यासाठी मी त्यांना जज करीत नाही. परंतु बलात्कार आणि जिवे मारण्याची धमकी देणे हे गंभीर आहे. कम आॅन ट्विटर इंडिया’
 }}}} ">You must report this. Twitter needs to take responsibility for this. They cannot provide a platform to people who openly threaten to rape and maim women.

You must report this. Twitter needs to take responsibility for this. They cannot provide a platform to people who openly threaten to rape and maim women.— Pooja Bhatt (@PoojaB1972) May 9, 2018}}}} ">— Pooja Bhatt (@PoojaB1972) May 9, 2018
ऋचाने आणखी एक ट्विट करताना लिहिले की, ‘प्रिय बेरोजगार, दहा रुपयांसाठी तुम्ही लोकांना ट्रोल करीत असता. पण माझ्याबद्दल असे करण्याचा विचारही करू नका. मी शिवीगाळ करण्याचा ठेका घेतला नाही.’ 

Web Title: Farhana Akhtar is angry with the threats to getting rid of the debt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.