फरहान- शिबानीकडे गुडन्यूज? सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 10:23 AM2022-02-20T10:23:05+5:302022-02-20T10:23:49+5:30

Farhan Akhtar-Shibani Dandekar Wedding: फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर अखेर विवाहबंधनात अडकले. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. शिवाय या फोटोनंतर सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा सुरु झाली.

farhan akhtar shibani dandekar wedding is shibani pregnant know the truth | फरहान- शिबानीकडे गुडन्यूज? सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य

फरहान- शिबानीकडे गुडन्यूज? सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता व दिग्दर्शक फरहान अख्तर (farhan akhtar)आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) अखेर विवाहबंधनात अडकले. काल 19 तारखेला दोघांनीही खंडाळा येथील फार्महाऊसवर काही निवडक पाहुण्यांच्या साक्षीने लग्नगाठ बांधली.  हा सोहळा खासगी राहावा, फरहान आणि शिबानीची इच्छा होती. त्यामुळे मीडियालाही या लग्नसोहळ्यापासून दूर ठेवण्यात आले होते. पण याऊपरही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेच. शिवाय या फोटोनंतर सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा सुरु झाली.

(साभार)

होय, नववधूला पाहताच,शिबानी दांडेकर प्रेग्नंट आहे का? असा प्रश्न चाहते विचारू लागले. याचा कारण ठरला शिबानीने लग्नात घातलेला लाल, बेज कलरचा गाऊन.   लग्नात शिबानीने लाल,बेज कलरचा गाऊन परिधान केला होता. पण या गाऊनमध्ये  लोकांना शिबानीचा बेबी बंप दिसू लागला. लग्नाआधीच कपलकडे गुडन्यूज आहे,असा अंदाज बांधला गेला. पण खरं सांगायचं तर असं काहीही नाही. हा केवळ गैरसमज म्हणता येईल.  

(साभार)

कारण लग्नाच्या एक-दोन दिवस आधी शिबानी जिम बाहेर दिसली होती. ती खरोखर प्रेग्नंट असती तर तेव्हाच चर्चा सुरू झाल्या असत्या. त्यामुळे शिबानी प्रेग्नंट असल्याची चर्चा निव्वळ अफवा आहे.
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर 2015 मध्ये  आय कॅन डू दॅट  या टेलिव्हिजन शोच्या सेटवर भेटले होते. फरहान अख्तर हा शो होस्ट करत होता आणि अभिनेत्री या शोमध्ये स्पर्धक होती. या शोदरम्यान दोघांची प्रेमकहाणी सुरु झाली होती.

Web Title: farhan akhtar shibani dandekar wedding is shibani pregnant know the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.