गरोदरपणात ‘या’ ५ कारणांनी वाढते अतिरिक्त वजन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST2017-04-18T12:22:00+5:302018-06-27T20:21:57+5:30

बहुतेक महिलांचे गरोदरपणात सुमारे ७ ते १८ किलोपर्यंत वजन वाढते. नेमके कोणत्या कारणांनी एवढे वजन वाढते याबाबत जाणून घेऊया.

Excessive weight increases by 5 reasons in pregnancy! | गरोदरपणात ‘या’ ५ कारणांनी वाढते अतिरिक्त वजन !

गरोदरपणात ‘या’ ५ कारणांनी वाढते अतिरिक्त वजन !

ुतेक महिलांचे गरोदरपणात सुमारे ७ ते १८ किलोपर्यंत वजन वाढते. नेमके कोणत्या कारणांनी एवढे वजन वाढते याबाबत जाणून घेऊया.
* ताणतणावThe journal Current Opinion in Clinical Nutrition and Metabolic Care च्या अहवालानुसार ताणतणावामुळेही गर्भारपणात अतिरिक्त वजन वाढण्याचा धोका वाढतो. म्हणून गर्भारपणात शक्य तितके तणावमुक्त राहणे फायदेशीर ठरेल.

* झोपेचा अभाव गरोदरपणात स्त्रीयांच्या शरीरात हार्मोनल बदल घडत असतात. शिवाय कामाच्या व्यापामुळे रात्री पुरेशी झोप होत नसेल तर शरीराला थकवा जाणवतो त्यामुळे जास्त आराम करावासा वाटतो. तसेच या थकव्यामुळे शारीरिक हालचाल होत नसल्याने वजन वाढण्यास मदत होते.

* कॅलरीज घेण्याच्या प्रमाणात वाढबऱ्याच महिला गरोदर असल्याचे समजताच अतिरिक्त अन्न घेणे सुरु करतात. त्या अन्नाबरोबरच कॅलरीज प्रमाणातही वाढ होते. त्यामुळे पहिल्या काही दिवसापासूनच वजन वाढण्यास सुरुवात होते. जर तुम्ही दिवसभरातून ४५० कॅलरीज अधिक घेत असाल तर आठवड्याला ०. ५ किलो वजन म्हणजे पहिल्याच महिन्यात २ किलो वजन वाढते.

* उच्च रक्तदाब आणि मधुमेहगर्भारपणात जर उच्च रक्तदाब असेल तर वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. तसेच मधुमेहामुळे स्त्रीचे वजन तर वाढतेचे शिवाय त्यामुळे बाळाचे देखील वजन वाढते.

* preeclampsiaया दरम्यान अतिरिक्त वजन वाढण्यास preeclampsia कारणीभूत ठरू शकते. उच्च रक्तदाब आणि युरिनमध्ये असलेल्या प्रोटीनच्या अधिक प्रमाणामुळे preeclampsia चा संभव गर्भारपणात होतो. शिवाय शरीरात तयार होणाऱ्या पाण्यामुळेही वजन वाढते आणि हे लक्षण preeclampsia चेच आहे.

* preeclampsiaया दरम्यान अतिरिक्त वजन वाढण्यास preeclampsia कारणीभूत ठरू शकते. उच्च रक्तदाब आणि युरिनमध्ये असलेल्या प्रोटीनच्या अधिक प्रमाणामुळे preeclampsia चा संभव गर्भारपणात होतो. शिवाय शरीरात तयार होणाऱ्या पाण्यामुळेही वजन वाढते आणि हे लक्षण preeclampsia चेच आहे.

Web Title: Excessive weight increases by 5 reasons in pregnancy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.