‘शिवाय’ मुळे खूप शिकता आले -सायेशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2016 18:56 IST2016-11-03T18:54:48+5:302016-11-03T18:56:11+5:30

अजय देवगण दिग्दर्शित ‘शिवाय’मध्ये सायेशा सेहगल हा नवा कोरा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. पहिला-वहिला चित्रपट असल्याने सायेशा या चित्रपटाबद्दल ...

Due to 'addition', we learned a lot - | ‘शिवाय’ मुळे खूप शिकता आले -सायेशा

‘शिवाय’ मुळे खूप शिकता आले -सायेशा

य देवगण दिग्दर्शित ‘शिवाय’मध्ये सायेशा सेहगल हा नवा कोरा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. पहिला-वहिला चित्रपट असल्याने सायेशा या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्साहित असणे साहजिकच होते. ‘शिवाय’मधून तिला बरेच काही शिकता आले.

‘क्यूट अ‍ॅण्ड गॉर्जिअस’ सायेशाने तिचा हा अनुभव शेअर केला. ती म्हणाली,‘कॅमेऱ्याविषयी मला काहीही माहिती नव्हते. मी ‘अखिल’(तिचा पहिला तेलुगू चित्रपट)च्या सेटवर गेल्यावर कॅमेऱ्याचे अँगल्स आणि लाईट्स इफेक्ट याविषयी शिकले. ‘शिवाय’च्या सेटवर मात्र मला यापेक्षा खूप नव्या नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. कारण या चित्रपटाचा सेट प्रचंड मोठा होता. माझ्यासाठी निश्चितपणे ही लर्निंग प्रोसेस होती. अजयकडूनही मला बरेच काही शिकता आले. त्याचा संयम, सतत कार्यमग्न असूनही मन आणि चित्त शांत ठेवणं, हा त्याचा स्वभाव मला बरेच काही सांगून गेला. त्याच्यासोबत बोलल्यानंतर तो इतका मोठा स्टार आहे, असे तुम्हाला चुकूनही वाटणार नाही.  

Web Title: Due to 'addition', we learned a lot -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.