श्रद्धाचे स्वप्नं झाले साकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 16:57 IST2016-10-25T16:56:11+5:302016-10-25T16:57:44+5:30

‘बी टाऊन’च्या सेलिब्रिटींनाही स्वप्नं असू शकतात ना? व्यक्ती म्हटल्यावर त्यांचीही स्वप्न, इच्छा, आकांशा,अपेक्षा आल्याच. असंच एक गोड स्वप्न चुलबुली ...

Dreams of faith come true! | श्रद्धाचे स्वप्नं झाले साकार!

श्रद्धाचे स्वप्नं झाले साकार!

ी टाऊन’च्या सेलिब्रिटींनाही स्वप्नं असू शकतात ना? व्यक्ती म्हटल्यावर त्यांचीही स्वप्न, इच्छा, आकांशा,अपेक्षा आल्याच. असंच एक गोड स्वप्न चुलबुली श्रद्धा कपूरचंही होतं. माहितीये काय? तर  एखाद्या चित्रपटात गाणं गायचं. पार्श्वगायिका होण्याचं. तिचं हे स्वप्न पूर्ण झालंय आणि यामुळे श्रद्धा सध्या जाम खूश आहे. ‘रॉक आॅन २’ सारख्या म्युजिकल ड्रामा चित्रपटात तिला तिचं हटके टॅलेंट जगासमोर आणण्याची संधी मिळाली. 
     
स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तिचा अनुभव शेअर करताना ती म्हणते, ‘मला गायला प्रचंड आवडतं. एखाद्या कलाकाराला चित्रपटात गाणं गाण्याची संधी क्वचितच मिळते. ही संधी मला मिळाली आणि म्हणून मी स्वत:ला नशीबवान समजते. संगीताचे जग म्हणजे जादुई दुनिया.  

‘रॉक आॅन २’च्या निमित्ताने या जादुई दुनियेची सैर करायला मला मिळाली ‘खरे तर ‘रॉक आॅन २’ मध्ये गाणे श्रद्धासाठी सोपे नव्हतेच. रॉक म्युजिक हे नवोदित गायकांसाठी चॅलेंजच आहे,असे श्रद्धाचे मत आहे. पण, रॉक म्युझिक श्रद्धालाही आवडते. म्हणूनच तिने हे आव्हान  स्वीकारले आणि ते यशस्वीपणे पेलूनही दाखवले. आहे ना श्रद्धा गुणी! 

shraddha kapoor

Web Title: Dreams of faith come true!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.