'डॉन' सिनेमाला झाले 40 वर्ष पूर्ण,असे करणार साजरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 15:07 IST2018-05-09T09:37:06+5:302018-05-09T15:07:06+5:30

 ७०च्या दशकातील सिनेमाचा विचार करायचा म्हटलं की आपण एका नव्या जगातच पोहोचतो. या जगात सिनेमाच्या नव्या प्रकाराचा जन्म झाला... ...

'Don' Cinematography completes 40 years, celebrates it | 'डॉन' सिनेमाला झाले 40 वर्ष पूर्ण,असे करणार साजरे

'डॉन' सिनेमाला झाले 40 वर्ष पूर्ण,असे करणार साजरे

 
०च्या दशकातील सिनेमाचा विचार करायचा म्हटलं की आपण एका नव्या जगातच पोहोचतो. या जगात सिनेमाच्या नव्या प्रकाराचा जन्म झाला... मग तो सिनेमा अॅक्श्न असो, थ्रिलर असो की म्युझिकल. असाच एक सिनेमा म्हणजे एक मास्टरपीस, अॅक्शन, थ्रिल, संगीत आणि सुपरहिट संवादाचा अप्रतिम मेळ असलेला, अमिताभ बच्चन आणि झीनत अमान यांचा डॉन. या सिनेमाने यंदा ४० वर्षांचा मैलाचा टप्पा गाठला आहे. सोनी पिक्चर्स नेटवर्क्समधील सोनी मॅक्स २ ही भारतातील हिंदी सिनेमांची अप्रतिम वाहिनी आपल्या 'कुछ फिल्मों का जादू कभी कम नहीं होता' या विचारसरणीसह सादर करत आहे. हा क्लासिक, अप्रतिम सिनेमा १२ मे २०१८ रोजी सायंकाळी ७ वाजता. मुंबईतील अंडरवर्ल्डची पार्श्वभूमी असलेली 'डॉन'ची कथा विजय या पात्राभोवती फिरते. विजय हा मुंबईच्या झोपडपट्टीत राहणारा एक साधा इसम आहे. मात्र, तो हुबेहुब डॉन या बड्या गुंडासारखा दिसतो. डीएसपी डीसिल्व्हा (इफ्तेकार) या पोलिस अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून तो डॉनचे रूप घेण्यास तयार होतो. असे करून तो पोलिसांचा खबऱ्या बनणार असतो आणि त्यातून पोलिसांना या गँगची पाळेमुळे खणून काढण्यास मदत होणार असते.

६०-७०च्या दशकात ज्यांचा जन्म झाला आहे त्यांच्यासाठी डॉन म्हणजे एक परिपूर्ण सिनेमा आहे.सिनेमा पाहताना तुम्हाला प्रचंड उत्साही करणाऱ्या या सिनेमातील,अगदी आपल्यातील दिसणारी नायिका आणि त्याचवेळी अतिशय कठोर अशी मारेकरी अशा दोन्ही भूमिका लिलया पेलणारी रोमा असो की एकमेवाद्वितीय डॉनच्या रुपातील विजय (अमिताभ) असो. प्राण, इफ्तेकार, हेलन, ओम शिवपूरी आणि सत्येन कप्पू यांच्या भूमिकाही विसरता येणार नाहीत.या सगळ्यांच्या दमदार अभिनयामुळे डॉन हा १९७८ मध्ये तिकिटबारीवर सर्वाधिक चाललेला सिनेमा ठरला.या सिनेमाने अमिताभ बच्चन यांना फिल्मफेअरचा मानाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळवून दिला.या सिनेमामुळे अप्रतिम फॅशनही पाहता आली. बेल बॉटम्स, पोलका डॉट्स आणि रंगीत चश्मे, ये मेरा दिल आणि खइके पान बनारसवाला सारखी कल्याणजी आनंदजी यांची अप्रतिम गाणी, अप्रतिम अॅक्शन, गाड्यांच्या धडका आणि कधीही विसरता येणार नाही असा अप्रतिम डायलॉग... 'डॉन' को पकडने की कोशिश ११ मुल्कों की पोलिस कर रही है, लेकीन डॉन को पकडना मुश्किल ही नहीं नामुमकिन है! योग्य घटकांसह जमून आलेली भट्टी म्हणजे डॉन सिनेमा आहे.

Web Title: 'Don' Cinematography completes 40 years, celebrates it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.