सचिन तेंडुलकरचा सिंगींग व्हिडिओ तुम्ही पाहिलातं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2017 10:22 IST2017-04-03T04:22:43+5:302017-04-03T10:22:18+5:30

क्रिकेट खेळण्यासोबतच सचिन तेंडुलकर एक चांगला सिंगर सुद्धा आहे आणि हे सिद्ध झाले आहे. काल रात्रीपासून सचिनचा एक सिंगींग व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

Do you see Sachin Tendulkar's co-staring video? | सचिन तेंडुलकरचा सिंगींग व्हिडिओ तुम्ही पाहिलातं?

सचिन तेंडुलकरचा सिंगींग व्हिडिओ तुम्ही पाहिलातं?

िन तेंडुलकर केवळ ‘क्रिकेटचा देव’च नाही तर एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आहे. अलीकडे सचिनमध्ये लपलेल्या एका सुप्त गुणाचे दर्शन त्याच्या चाहत्यांना घडले. होय, क्रिकेट खेळण्यासोबतच सचिन एक चांगला सिंगर सुद्धा आहे आणि हे सिद्ध झाले आहे. काल रात्रीपासून सचिनचा एक सिंगींग व्हिडिओ व्हायरल होतो आहे. यात सचिन बेधूंद होऊन गातो आहे. आत्तापर्यंत  हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय. या व्हिडिओत सचिन व बॉलिवूडचा सुप्रसिद्ध सिंगर सोनू निगम हे दोघे ‘क्रिकेटवाली बीट पे’ हे गाणे गाताना दिसताहेत. यातील सचिनचा आवाज तुम्ही अगदी सहज ओळखू शकता. इंडियन आइडलच्या ग्रॅण्ड फिनालेदरम्यान हा व्हिडिओ दाखवला गेला होता. अगदी त्याक्षणाला सचिनच्या अनेक चाहत्यांनी हा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर शेअर करणे सुरु केले.



 काल-परवा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर आणि पार्श्वगायक सोनू निगम पाठमोरे उभे असलेले दिसले होते. शिवाय फोटोत सोनू निगमच्या हातात बॅट दिसत होती तर सचिन तेंडुलकरच्या हातात माईक़ तेव्हापासून या फोटोमागचे ‘रहस्य’ काय, हे जाणून घेण्यासाठी सगळेच बैचेन झाले होते. अनेकांनी हा फोटो सचिनच्या आयुष्यावर बनणाºया ‘सचिन’ या चित्रपटाशी संबंधित असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. पण सचिन व सोनूच्या व्हिडिओच्या रूपात या फोटोमागचे रहस्य उघड झाले आहे. कालपरवा सचिनने १०० एमबी नावाच्या मोबाईल अ‍ॅपचा शुभारंभ केला. या अ‍ॅपवर सचिनशी निगडीत सगळ्या बातम्या, किस्से मिळतील. म्हणजे काय तर सचिनने नवी डिजिटल इनिंग सुुरु केली आहे. शिवाय सिंगींग डेब्यूही. तेव्हा बघा तर सचिनचा एक नवा अंदाज!!

Web Title: Do you see Sachin Tendulkar's co-staring video?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.