​तुम्हाला माहीत आहे का, हा चित्रपट बनवायला निर्मात्याला जवळजवळ लागले 20 वर्षं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2017 17:42 IST2017-07-17T12:12:16+5:302017-07-17T17:42:16+5:30

एखादा चित्रपट बनवण्यासाठी किती काळ लागतो असे तुम्हाला कोणी विचारले तर तुम्ही काय सांगाल तर एखादा चित्रपट बनवण्यासाठी जास्तीत ...

Do you know, the maker has almost 20 years to make this movie | ​तुम्हाला माहीत आहे का, हा चित्रपट बनवायला निर्मात्याला जवळजवळ लागले 20 वर्षं

​तुम्हाला माहीत आहे का, हा चित्रपट बनवायला निर्मात्याला जवळजवळ लागले 20 वर्षं

ादा चित्रपट बनवण्यासाठी किती काळ लागतो असे तुम्हाला कोणी विचारले तर तुम्ही काय सांगाल तर एखादा चित्रपट बनवण्यासाठी जास्तीत जास्त दोन वर्षं लागत असतील. आज तंत्रज्ञान इतके खूप पुढे गेले आहे की त्यामुळे काही महिन्यात देखील चित्रपट बनवता येतो. पूर्वीच्या काळात एखादा चित्रपट बनवायला पाच-सहा वर्षं देखील लागत असत. पण एखाद्या चित्रपटासाठी 20 वर्षं लागले आहेत असे कोणी तुम्हाला सांगितले तर तुम्हाला त्यावर विश्वास बसेल का?
हो, हे खरे आहे. एक जुना चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांना तब्बल 20 वर्षं लागले होते. या चित्रपटाचे नाव लव्ह अँड गॉड असून या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अनेक अडचणी आल्या होत्या. मुघल-ए-आझम हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील मधुबाला, दिलीप कुमार, पृथ्वीराज कपूर यांच्या अभिनयाचे आज देखील कौतुक केले जाते. प्यार किया तो डरना क्या हे गाणे आजही लोकांमध्ये तितकेच लोकप्रिय आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी 14 वर्षं इतका कालावधी लागला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन के आसिफ यांनी केले होते. त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या लव्ह अँड गॉड हा चित्रपट अनेक वर्षं रखडला होता. हा चित्रपट बनवण्यासाठी तब्बल 20 वर्षं लागले होते. 
लव्ह अँड गॉड या चित्रपटात गुरू दत्त प्रमुख भूमिकेत होते. पण चित्रीकरण सुरू असताना 1964 साली गुरुदत्त यांचे निधन झाले. त्यांच्यासोबत चित्रपटाचे अर्धे चित्रीकरण झाले होते. त्यांच्या मृत्युनंतर 1970 मध्ये संजीव कुमार यांच्यासोबत पुन्हा चित्रीकरण करायला सुरुवात करण्यात आली. पण चित्रीकरण सुरू असताना 1971मध्ये दिग्दर्शक आसिफ यांचा मृत्यू झाला. त्यामुळे तो चित्रपट रखडला. अखेर 15 वर्षांनंतर त्या चित्रपटाचे चित्रीकरण आसिफ यांच्या पत्नीने पूर्ण केले आणि 1986ला लव्ह अँड गॉड हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधी 1985 मध्ये संजीव कुमार यांचे निधन झाले होते. 

Also Read : बॉलिवूडच्या चित्रपटात नायक-नायिकेने घातलेल्या कपड्यांचे काय होते तुम्हाला माहीत आहे का?

Web Title: Do you know, the maker has almost 20 years to make this movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.